सार

बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये घडवून आणलेल्या स्फोटाप्रकरणात एनआयएला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी मुसाविर हुसैन शाजिब याला अटक करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

Rameswaram Cafe Blast Case : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाप्रकरणातील एनआयएला (NIA) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील हल्लेखोर मुसाविर हुसैन शाबिज (Musawir Hussain Shabij) याला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शाबिजने पळ काढला होता.

आसाम आणि पश्चिम बंगालसोबतच्या एका संयुक्त ऑपरेशनअंतर्गत एनआयएने शाबिजला अटक केली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित हाती लागला आहे. मुसाविर हुसैन शाबिजवर रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आरोप आहे.  

नक्की काय घडले होते?
बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्चला दुपारच्या वेळेस स्फोट झाला. या स्फोटात नऊजण जखमी झाले होते. तपासात असे समोर आले की, रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाचे धागेदोरे दहशतवादी संघटना आयएसआयएससोबत (ISIS) आहेत.

टोपीमुळे शाबिजची ओखळ पटली होती
कॅफेमध्ये स्फोट घडल्याच्या प्रकरणानंतर टोपी घातलेल्या एका व्यक्तीचा फोटो समोर आला होता. यानंतर आरोपीचा फोटो सर्वत्र झळकवण्यातही आला होता. पोलिसांना तपासात दिसून आले की, शाबिजने एका दुकानातून टोपी खरेदी केली. सीसीटीव्ही फुटेजमुळे शाबिज आणि त्याचा साथीदार अब्दुल मतीन ताहाची देखील ओखळ पटली गेली.

शाबिज कर्नाटकात राहणारा आहे. एनआयएला शाबिज मालेनाडु परिसरातील दहशतवादी संघटनांमधील असल्याचा संशय आहे. या खुलासानंतर मंगळुरू आणि कोयंबटुर येथील घटनांसह बॉम्ब स्फोटासारख्या प्रकरणातील आरोपींचे धागेदोरे मिळू शकतात अशीही माहिती समोर आली आहे.

तुरुगांतील तीन जणांसोबत शाजिबचे संबंध
एनआयकडून अटक करण्यात आलेल्या शाबिजचे कॅफेमधील स्फोटात अटक करण्यात आलेल्या तिघांसोबत आधीपासूनच संबंध आहेत. सध्या पोलिसांकडून आरोपींच्या आधीच्या गुन्हांबद्दल अधिक माहिती मिळवली जात आहे.

आणखी वाचा : 

Haryana : दारूच्या नशेत चालक, 120 च्या स्पीडने जाणारी स्कूल बस उलटली; 6 मुलांचा मृत्यू

'भारतात सर्व धर्मातील नागरिक खुश...', अल्पसंख्यांकांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावावर PM नरेंद्र मोदींनी दिले हे उत्तर

PM नरेंद्र मोदींची भेट घेणार एलॉन मस्क, काय असणार अजेंडा वाचा सविस्तर…