सार

कुत्रे चावण्याची प्रकरणे सातत्याने वाढत चालली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कुत्रे चावण्याची प्रकरणे ऐकल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशातच चंदीगडमध्ये सात प्रजातींच्या कुत्र्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

Ban On 7 Dog Breeds : चंदीगड येथे सात खतरनाक कुत्र्यांच्या प्रजातीवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय नियम मोडल्यास 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. चंदीगडमध्ये दिवसागणिक कुत्रे चावण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. अशातच चंदीगडमध्ये पेट डॉग्स अ‍ॅम्ड कम्युनिटी डॉग्स बायलॉज (Chandigarh Pet Dogs and Community Dogs Bylaw) 2023 साठी मंजूरी दिली आहे. यानुसार, आता शहरात पाळीव कुत्र्यांचे रजिस्ट्रेशन नागरिकांना करावे लागणार आहे. याची जबाबदारी मालकांची असणार आहे. याशिवाय कुत्र्यांना कोणत्याही ठिकाणी जेवण देता येणार नाही. अन्यथा महापालिकेकडून कार्यवाही केली जाणार आहे.

चंदीगडमध्ये या सात कुत्र्यांच्या प्रजातींवर बंदी
चंदीगडमध्ये अमेरिकन बुलडॉग, पिटबुल, बुल टेरियर, कॅन कोरसो, डोगो अर्जेंटीनो, रॉटविलर.

घरात कुत्रा पाळण्यासंबंधित नियम
कुत्रा घरात पाळण्यासंबंधित पाच मर्ला (युनिट) किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या घरात एकच कुत्रा पाळण्यास परवानगी असणार आहे. वेगवेगळ्या मजल्यांवर एकापेक्षा अधिक परिवार राहत असल्यास अधिकाधिक तीन कुत्र्यांना परवानगी असणार आहे. पाच मर्लापेक्षा अधिक मोठ्या आणि 12 मार्लापेक्षा कमी घरांमध्ये दोन कुत्रे पाळण्यास परवानगी असणार आहे. यामध्येही वेगवेगळ्या मजल्यांवर तीन कुत्र्यांना परवानगी असणार आहे.

500 रुपये शुल्क देऊन करावे लागणार रजिस्ट्रेशन
घरात कुत्रा पाळण्यासाठी 500 रुपयांचा शुक्ल भरून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. अर्जासह कुत्र्यांचे दोन फोटो आणि लसीकरण सर्टिफिकेटही लावणे गरजेचे असणार आहे. कुत्र्यांना एक मेटल टोकन दिले जाणार आहे. जे कुत्र्यांचे गळ्यात बांधावे लागणार आहे. हे रजिस्ट्रेशन आयुष्यभरासाठी असून प्रत्येक पाच वर्षांनी रिन्यू करावे लागणार आहे.

आणखी वाचा : 

Uttar Pradesh : महामार्गावर कार उभी करून नव वराला स्टंट करणे पडले महागात, पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आणि....

CAA बाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल, मोदी सरकार नागरिकत्वाचा हक्क हिरावून घेण्याचा कट रचत असल्याचा केला आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 41 दिवसांत 24 राज्यांचा गेला जलद दौरा, बंगालातही पोहोचले पंतप्रधान