सार

Ayodhya Ram Temple : सद्गुरू म्हणाले की, राम मंदिराची उभारणी म्हणजे लोप पावलेल्या राष्ट्रीय भावनेचे पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. अयोध्येतील राम मंदिराचे संपूर्ण देश स्वागत करत आहे.

Ayodhya Ram Temple : अयोध्येमध्ये उभारण्यात येणाऱ्या श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनीही राम मंदिर उभारणी आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सद्गुरू म्हणाले की, राम मंदिराची उभारणी म्हणजे लोप पावलेल्या राष्ट्रीय भावनेचे पुनरुज्जीवन आहे. अयोध्येतील राम मंदिराचे संपूर्ण देश स्वागत करत आहे.

“समतोल साधण्याची विलक्षण क्षमता”

सद्गुरू म्हणाले की, राम मंदिर हे सभ्यतेच्या पुनर्प्राप्तीचे प्रतीक आहे. राम मंदिर म्हणजे लोप पावलेल्या राष्ट्रीय भावनेच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. आपले राज्य आणि आपली पत्नी गमावल्यापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत रामाचे संपूर्ण जीवन खूप कष्टाचे होते. तरीही समतोल साधण्याची त्यांच्यातील क्षमता आजही त्यांना विलक्षण बनवते.

सद्गुरू पुढे असेही म्हणाले की, लोक रामाची उपासना जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी नव्हे तर त्या सभ्यतेसाठी करताहेत, ज्यासह प्रभू रामांनी सर्वात कठीण क्षणांचा सामना केला. लोक 500 वर्षांहून अधिक काळ राम मंदिराची प्रतीक्षा करताहेत. त्यामुळे देशभरात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

"सर्व नेत्यांनी रामाची पूजा करावी"

“पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 11 दिवसांचे अनुष्ठान करत आहेत. हे पाहून फार आनंद होतो. न्यायप्रिय नेत्याचे प्रतीक मानले जाणाऱ्या रामाचे ते अनुष्ठान करत आहेत. केवळ एका नेत्याने नव्हे तर भारतातील सर्व नेत्यांनी व नागरिकांनी न्यायपूर्ण, स्थिर व समृद्ध भारत घडवण्यासाठी अनुष्ठानामध्ये सहभागी झाले पाहिजे. हेच राम राज्य आहे”, असेही सद्गुरू म्हणाले.

आणखी वाचा :

Ram Mandir EXCLUSIVE : रामललांची मूर्ती साकारणारे अरुण योगीराज म्हणाले- ‘प्रभूंनी मला दर्शन दिले, हा सर्वात मोठा आनंद’

Ayodhya Ram Mandir Video: रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पाहा अयोध्येतील राम मंदिराची झलक

Ram Lalla Murti : श्री राम मंदिरातील रामललांच्या मूर्तीची पहिली झलक

Ayodhya Ram Mandir : रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी, पाहा राम मंदिराचे Exclusive Photos