सार
Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर, 2023 रोजी अयोध्येतील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहे. यासाठी तयारी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.
Airport and Railway Station in Ayodhya : अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी हा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे. तत्पूर्वी अयोध्येतील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान विमानासह वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
हे आहे विमानतळाचे नाव
अयोध्येत तयार करण्यात आलेल्या विमानतळाला मर्यादा पुरषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळ (Maryada Purushottam Shri Ram International Airport) हे नाव देण्यात आले आहे. यासोबत अयोध्येतील रेल्वे स्थानकाचाही शुभारंभ करणार आहेत.
30 डिसेंबर (2023) रोजी सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी अयोध्या विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने एक विमान रवाना केले जाणार आहे. तसेच अयोध्या रेल्वे स्थानकातून 'वंदे भारत' (Vande Bharat) ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रवाना केली जाणार आहे.
अयोध्येत बांधकामाला वेग
अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. यामुळे अयोध्येत रामलल्लांच्या मंदिरासह अन्य बांधकाम वेगाने सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 डिसेंबरला (2023) अयोध्येत पोहोचणार असून येथे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत. यादरम्यान, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह काही प्रशासकीय अधिकारीही उपस्थितीत असणार आहेत. पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्यासाठीही तयारी सुरू करण्यात आली आहे.
आणखी वाचा:
Makrana Marble : राम मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या दगडाची किंमत माहितीये?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर निर्मितीमुळे रोजगार वाढला, फुल विक्रेत्यांना अच्छे दिन - स्थानिक
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण