विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ शरद पवार गटात दाखल? सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

| Published : May 11 2024, 12:40 PM IST

narhari zirwal

सार

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाच्या स्टेजवर दिसल्यामुळे सगळीकडे चर्चांना पेव फुटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करताना दिसत आहेत. पण हे कमी की काय म्हणून आता अजित पवार गटाचे कार्यकर्ते हेही महाविकास आघाडीचा प्रचार करताना दिसत असल्याचं चित्र सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसून येत आहे. नरहरी झिरवळ यांचा एक फोटो व्हायरल झाला असून ते महाविकास आघाडी उमेदवाराच्या स्टेजवर दिसून आले आहेत. 

नरहरी झिरवळ कोठे बसले होते - 
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार या उभ्या असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे उमेदवार म्हणून उभे आहेत. याच दिंडोरीमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. नरहरी झिरवळ यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. 

नरहरी झिरवळ काय म्हणाले?- 
“माझ्याबद्दल गैरसमज होता. ज्या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचार करत होते, त्या गावात पूजा करण्यासाठी मला बोलावण्यात आले होते. तेथे हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी गेलो.  मी तिथे फक्त मंदिराच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथल्या लोकांच्या आग्रहाखातर मी खुर्चीवर बसलो. त्यावेळी दिंडोरीतील उमेदवार भास्कर भगरे व अन्य काही नेते जवळ येऊन बसले. काही मिनिटांतच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे अधिकारी निघून गेले. मी अजित पवार यांच्यासोबत आहे." असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

झिरवळ यांनी खेळली खेळी - 
नरहरी झिरवळ यांनी खेळी खेळली असून त्यांनी कार्यकर्त्यांकडे संदेशही पोहचवल्याचे सांगण्यात येत आहे. नरहरी झिरवळ यांना उमेदवारी मिळवून देण्यामागे श्रीराम शेटे यांचा मोठा हात होता, त्याच शेटे यांनी भगरे यांना उमेदवारी मिळवून दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे स्टेजवर बसून योग्य संदेश पोहचवल्याचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे. 
आणखी वाचा - 
दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने भारताचे नाव केले रोशन, भालाफेकमध्ये मिळवले रौप्य पदक
D-Voter म्हणजे कोण? ज्यांना देशात राहूनही करता येत नाही मतदान