सार
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मद्य धोरणात घोटाळा केल्यामुळे ईडीने अटक केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मद्य धोरणात घोटाळा केल्यामुळे ईडीने अटक केली आहे. ईडीच्यावतीने अरविंद केजरीवाल यांची दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आपचे नेते माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे नेते विजय नायर यांना याआधी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बाजू जेष्ठ वकील विक्रम चौधरी हे मांडणार आहेत. केजरीवाल यांच्या वतीने ईडीच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात दिल्ली आणि देशभरात निदर्शने करण्यात आली आहेत. आपचे कार्यकर्ते केजरीवालांच्या अटकेनंतर आक्रमक झालेले दिसून आले.
केजरीवाल हे तुरुंगातून मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पाहतील असे आपच्या वतीने सांगण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण नाकारल्यानंतर अरविंद केजरीवाल अटक करण्यात आली. आपच्या आधी अटक केलेल्या दोन नेत्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नसल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अशाप्रकारे कोणता दिलासा मिळेल अशी अपेक्षा सध्याच्या घडीला व्यक्त होत नाही.
आणखी वाचा -
शाहरुख खान आणि उर्फी जावेदची झाली भेट? सेल्फी फोटो शेअर केल्याने चाहते हैराण
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागणार की तुरुंगातून चालवणार सरकार?