SBI Marks RCom Loan : पत्रामध्ये अनिल अंबानी यांचे वकील यांनी म्हटले आहे की, SBI ने कारणे दाखवा नोटिसच्या अमान्यतेबद्दल अंबानींच्या संवादाला जवळजवळ वर्षभर उत्तर दिलेले नाही.

Rcom Loan Fraud : उद्योगपती अनिल अंबानींची दिवाळखोर झालेली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनचे कर्ज खाते एसबीआयकडून फ्रॉड म्हणून घोषित करण्यात आले आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका पत्रामध्ये याची माहिती देत एसबीआयने म्हटले की, आरकॉमने मंजूर कर्जाचे पैसे चुकीच्या पद्धतीने इतर कंपन्यांना हस्तांतरित केले. यामुळे त्यांच्याकडून इंटर कंपनी ट्रांजेक्शन आणि विक्री संदर्भातील बिलांचा दुरपयोग करण्यात आला.

वकिलांचे एसबीआयला उत्तर

अनिल अंबानी यांच्या वकिलांनी रिलायन्स कम्युनिकेशनचे कर्ज खाते फ्रॉड घोषित केल्यानंतर विरोध दर्शवला. याशिवाय बँकेला एक पत्र देखील लिहिले आहे. 2 जुलै 2025 रोजी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, एसबीआयच्या या पावलामुळे आरबीआयच्या गाइडलाइन्स आणि कोर्टाच्या निर्देशांचे उल्लंघन झाले आहे.

रिलायन्स कम्युनिकेशनकडून बुधवारी स्टॉक मार्केटला पाठवण्यात आलेल्या सूचनेत म्हटलेय की, एसबीआय 2016 च्या प्रकरणात कथित रुपात पैसे दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचा संदर्भत देत त्यांचे कर्ज खाते फ्रॉड असल्याचे म्हटले जात आहे. अनिल अंबानींच्या वकिलांनी म्हटले की, एसबीआयच्या RCom च्या कर्ज खात्याला फ्रॉड सांगण्याचा आदेश धक्कादायक आणि एकतर्फी असण्यासह नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचेही उल्लंघन करतो.

आरबीआयच्या गाइडलाइन्सचे उल्लंघन

वकिलांनी म्हटले की, एसबीआयचे आदेश सुप्रीम कोर्ट आणि मुंबई कोर्टाच्या वेगवेगळ्या निर्णयासह आरबीआयच्या गाइडलाइन्सचे थेट उल्लंघन आहे. पत्रामध्ये अनिल अंबानींच्या वकिलांनी पुढे म्हटले आहे की, एसबीआयने कारणे दाखवा नोटीसच्या अमान्यतेबद्दल अंबानींच्या संवादाला जवळजवळ एक वर्ष उत्तर दिलेले नाही. याशिवाय बँकेने अंबानींना त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांच्या विरोधात बाजू मांडण्यासाठी वेळ देखील दिलेला नाही. अंबानी कायदेशीर सल्ल्यानुसार केस पुढे घेऊन जात असल्याचेही वकिलांनी म्हटले आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.