सार

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगचे काही फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर या दोघांच्या प्री-वेडिंगदरम्यान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant's Pre-wedding Celebrations : मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगची चर्चा जगभरात होत आहे. अंबानी परिवारासह प्री-वेडिंगला लावलेल्या पाहुण्यांचे सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाली.

प्री-वेडिंगच्या सोहळ्यासाठी जोरदार तयारी जामनगरमध्ये (Jamnagar) करण्यात आली होती. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ‘अथर्वशीर्ष’ मधील मंत्र एका सुरात बोलले जात असल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवनून आणणारा नीता अंबानींच्या डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

View post on Instagram
 

जामनगरमध्येच का ठेवला प्री-वेडिंग सोहळा?
गुजरातमधील जामनगर येथे अनंत आणि राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा ठेवण्यामागे खास कारण असल्याचे नीता अंबानींने सांगितले आहे. नीता अंबानी यांनी म्हटले की, आकाश, अनंत आणि ईशाचे बालपण जामनगर येथे गेले आहे. यामुळे परिवाराची पायामुळे येथून रुजली गेल्याने त्यांना त्याचे महत्त्व कायम टिकवून ठेवण्यासाठीच जामनगर येथे प्री-वेडिंगचा सोहळा आयोजन केला आहे.

याशिवाय मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन यांच जन्म जामनगर येथे झाला होता. अनंत यांचे आजोबा धीरूभाई अंबानी यांनीही आपला व्यवसाय जामनगर येथून सुरू केला होता. अशातच अंबानी परिवारासाठी जामनगर अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण ठिकाण आहे.

आणखी वाचा : 

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, लेकाच्या लग्नसोहळ्यासाठी या गाण्यावर थिरकणार (Watch Video)

अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगला पॉप सिंगर रिहानाचा धमाकेदार परफॉर्मन्स, जिंकली भारतीयांची मनं (Watch Video)

IPL 2024 प्रोमो झाला व्हायरल, व्हिडिओत कोणता खेळाडू काय बनला?