सार

DMDK Vijayakanth Passed Away : DMDKचे संस्थापक विजयकांत यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.  

DMDK Vijayakanth Passed Away : डीएमडीकेचे (Desiya Murpokku Dravida Kazhagam) संस्थापक विजयकांत यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. 

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने विजयकांत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीदरम्यान त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. यानंतर विजयकांत यांना व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते, पण त्यांचा जीव वाचू शकला नाही. चेन्नईतील एमआयओटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

एमआयओटी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, “कॅप्टन विजयकांत यांना न्यूमोनिया आजारामुळे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. मेडिकल स्टाफने आपले सर्व प्रयत्न केले, पण गुरुवारी सकाळी (28 जानेवारी 2023) त्यांचे निधन झाले".

विजयकांत यांना मंगळवारी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते दाखल

विजयकांत यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी मंगळवारी (26 डिसेंबर 2023) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या पक्षाकडून देण्यात आली होती. यावेळेस विजयकांत यांची प्रकृती ठीक असून वैद्यकीय तपासणीनंतर ते घरी परतणार असल्याचंही सांगण्यात आले. यानंतर गुरुवारी सकाळी पक्षाने सांगितले की, विजयकांत यांची कोव्हिड-19ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

आधीपासूनच होता श्वसनाचा आजार

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला विजयकांत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 20 नोव्हेंबर रोजी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. श्वसनाशी संबंधित आजारामुळे त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते.

विजयकांत यांनी 154 चित्रपटांमध्ये केले काम

विजयकांत हे एक प्रसिद्ध अभिनेते देखील होते. त्यांनी जवळपास 154 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि डीएमडीके पक्षाची स्थापना केली. दोन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले.

आणखी वाचा : 

Bus Accident : ट्रकच्या धडकेनंतर बसला लागली आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू, 17 जखमी

नववर्षात विमानतळांवर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, मुंबई-दिल्लीसह या 7 ठिकाणी ALERT

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी पाठवण्यात आल्या तब्बल 42 घंटा, पाहा भाविकांनी कशी केली पूजा