सार

आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजप मुख्यालय दिल्ली येथे आम आदमी पक्षाकडून मोर्चा काढला जाणार आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली येथील भाजपच्या कार्यलयाबाहेर निदर्शन केली जाणार असून यामुळे दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्या अटकेच्या विरोधात ही निदर्शने केली जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयटीओ मेट्रो स्टेशनवर प्रवेश आणि बाहेर पडणे बंद राहणार आहे. 

कोणता रस्ता केला जाणार बंद - 
ट्रॅफिकच्या नियमानुसार DDU मार्ग सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 दरम्यान वाहतुकीसाठी बंद असू शकतो आणि अनेक मार्गांवर जास्त ट्राफिक होण्याची शक्यता आहे.  ज्यामुळे लोकांना त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कृपया बाहेर पडताना दिल्ली येथील नागरिकांनी पोलिसांनी दिलेली नियमावली तपासून पाहावी आणि त्यानंतरच बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा. 

डीडीयु मार्गावर करण्यात आली प्रतिबंधात्मक योजना - 
कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी डीडीयु मार्गावर पोलिसांना तैनात केले जाणार आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. आंदोलनाच्यापूर्वी दिल्लीतील भाजप कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आम आदमी पक्षाने कोणतीही परवानगी मागितली नसून त्यांना भाजपच्या कार्यालयाकडे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

बिभव कुमार यांच्या अटकेच्या विरोधात केले जाणार आंदोलन - 
आप नेते अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्री निवासस्थानावरून अटक केली असून हे आंदोलन या अटकेच्या विरोधातच केले जाणार आहे. 
आणखी वाचा - 
Swati Maliwal Assault Case : बिभव कुमार यांचा फोन फॉरमॅट, मुख्यमंत्री निवासातील कॅमेऱ्यातील क्लिप गायब असल्याचा दिल्ली पोलिसांनी केला दावा
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक पती पत्नीवर झाडल्या गोळ्या, शोपियानमध्ये भाजप नेत्याची हत्या