- Home
- Entertainment
- जगातील सर्वात फ्लॉप 800 कोटींच्या बजेटचा चित्रपट माहित आहे का? कंगनाच्या 'धाकड' पेक्षाही मोठा डब्बा?
जगातील सर्वात फ्लॉप 800 कोटींच्या बजेटचा चित्रपट माहित आहे का? कंगनाच्या 'धाकड' पेक्षाही मोठा डब्बा?
मुंबई - तब्बल ८०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला आणि बहुचर्चित 'कटथ्रोट आयलंड' हा चित्रपट १०० कोटीही कमावू शकला नाही आणि तो फ्लॉप ठरला. या चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.

जगातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट
एखादा चित्रपट हिट होण्यासाठी मोठे कलाकार किंवा प्रचंड बजेट असणे गरजेचे नाही, तर कथा दमदार असली तरी पुरेसे आहे, हे काही चित्रपटांनी सिद्ध करून दाखवले आहे. नुकतेच आलेले टुरिस्ट फॅमिली, सैयारा, सू फ्रॉम सो यांसारखे चित्रपट केवळ ५ ते ६ कोटी रुपयांत बनले, पण त्यांनी तब्बल १०० कोटींच्या घरात कमाई केली. इतकेच नव्हे तर या चित्रपटांना जागतिक स्तरावरही मान्यता मिळाली.
मात्र याउलट, तब्बल ८०० कोटींपेक्षा जास्त खर्च करून तयार केलेला एक भव्य चित्रपट १०० कोटींचीदेखील कमाई न करता मोठा फ्लॉप ठरला आहे. या लेखात आपण त्या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.
३० वर्षांपूर्वीही मोठ्या बजेटवर...
'कटथ्रोट आयलंड' चित्रपट
सिनेमात यश-अपयश हे नेहमीच असते. काही चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होतात, तर काही मोठ्या बजेटमध्ये, मोठ्या अपेक्षांसह तयार होऊनसुद्धा प्रचंड अपयशी ठरतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे कट थ्रोट आयलंड (Cutthroat Island).
१९९५ साली प्रदर्शित झालेला हा हॉलिवूडचा अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट आजही "जगातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट" म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे.
या चित्रपटासाठी तब्बल ८५७ कोटी रुपये (९८ मिलियन डॉलर्स) खर्च करण्यात आला होता. मात्र प्रदर्शना नंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ १० मिलियन डॉलर्स म्हणजे सध्याच्या किमतीनुसार सुमारे ८८ कोटी रुपयेच कमाई केली.
'कटथ्रोट आयलंड'ची कथा
रेनी हार्लिन दिग्दर्शित या चित्रपटात गीना डेविस, मॅथ्यू मोडिन, फ्रॅंक लॅंगेला आणि मॉरी चायकिन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एकूण २ तास ४ मिनिटांचा हा चित्रपट एका महिला समुद्री चाचे आणि तिच्या साथीदाराच्या खजिन्याच्या बेटाच्या शोधयात्रेवर आधारित आहे. ही कथा लोकांना मात्र आवडली नाही. त्यांना ती निरस वाटली. त्यामुळे लोकांनी या चित्रपटासाठी गर्दी केली नाही.
८०० कोटींचा 'कटथ्रोट आयलंड'
भव्य सेट्स, ग्राफिक्स आणि प्रचंड निर्मिती खर्चाने तयार झालेला हा चित्रपट जवळपास ३० वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला तेव्हा त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र प्रदर्शना नंतर प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि चित्रपटाला मोठा तोटा सहन करावा लागला.
या चित्रपटाच्या अपयशामुळे त्याचे निर्माते असलेल्या कॅरोल्को पिक्चर्स या कंपनीला दिवाळखोरी जाहीर करावी लागली. त्या काळात हॉलिवूडमध्ये इतका मोठा तोटा कोणत्याही चित्रपटामुळे झाला नव्हता. त्यामुळेच कट थ्रोट आयलंड ला "बॉक्स ऑफिस आपत्ती" (Box Office Disaster) म्हणून ओळखले जाऊ लागले.
सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट
IMDb च्या रेटिंगनुसार या चित्रपटाला ५.७ गुण मिळाले आहेत. सध्या हा चित्रपट YouTube वर मोफत पाहता येतो.
या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३० वर्षे उलटली तरी जगातील इतर कोणत्याही अपयशी चित्रपटाने याचा विक्रम मोडू शकलेला नाही. आजही कट थ्रोट आयलंड हा जगाच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक खर्च करून तयार झालेला आणि सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट म्हणून ओळखला जातो.
म्हणूनच कट थ्रोट आयलंड ला आजही जगातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट हीच उपाधी मिळालेली आहे.

