- Home
- Entertainment
- धर्मेंद्र यांना तातडीने ICU मध्ये केलं दाखल, कर्मचाऱ्याने दिलेली माहिती वाचून तोंडावर घ्याल हात मारून
धर्मेंद्र यांना तातडीने ICU मध्ये केलं दाखल, कर्मचाऱ्याने दिलेली माहिती वाचून तोंडावर घ्याल हात मारून
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

धर्मेंद्र यांना तातडीने ICU मध्ये केलं दाखल, कर्मचाऱ्याने दिलेली माहिती वाचून तोंडावर घ्याल हात मारून
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आयसीयूत करण्यात आले दाखल
89 वर्षीय अभिनेते गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय देखरेखीखाली होते आणि आता पुढील तपासणीसाठी ते आयसीयूमध्ये भरती झाले आहेत. त्यांच्यावर वरिष्ठ डॉक्टर देखरेख ठेवत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी देणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये कोण आहे?
त्यांचे दोन्ही मुलगे सनी देओल आणि बॉबी देओल हे त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आहेत. ते नियमितपणे तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आणखी काही चाचण्या केल्या जाणार आहेत.
कर्मचाऱ्याने काय सांगितलं?
ब्रीच कँडी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने सांगितले की, "धर्मेंद्र रुग्णालयात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार घेऊन आले होते. ते आयसीयूमध्ये आहेत आणि सध्या झोपले आहेत." असं कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.
डिस्चार्जबाबत काय काय मिळाली माहिती
रुग्णालयातील कर्मचाऱ्याने याबाबतची माहिती दिली असून "सध्या काळजी करण्यासारखे काहीही नाही. ते स्थिर आहेत. त्यांचे पॅरामीटर्स ठीक आहेत. त्यांच्या हृदयाचे ठोके 70 वर आहेत. त्यांचा रक्तदाब 140/80 आहे. त्यांचे युरीन सॅम्पलपण ठीक आहे."
रुग्णालयातील कर्मचाऱ्याने काय दिली माहिती?
रुग्णालयातील डॉक्टरने त्यांना सतत निगराणीखाली ठेवायला सांगितलं आहे. परंतु डिस्चार्जची तारीख सांगितलेली नाही. त्यांची दोन्ही मुलं त्यांच्यासोबत असून त्यांनी आपली कामे सुद्धा पुढे ढकलेली आहे.

