अमीरच्या घटस्फोटामुळे मुलगी झाली होती वेडी, किस्सा वाचून बसेल विजेचा झटका
आमिर खानची मुलगी इरा खान हिने तिच्या नैराश्यावरील आठ वर्षांची थेरपी संपल्याची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर माहिती देताना तिने सांगितले की, थेरपी संपली असली तरी ती काही काळ औषधांवर असेल.

अमीरच्या घटस्फोटामुळे मुलगी झाली होती वेडी, किस्सा वाचून बसेल विजेचा झटका
अमीर खानची मुलगी इरा खान हि अनेकदा नैराश्याबद्दल बोलताना दिसून येत असते. तिने अनेकवेळा याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. ती तिच्या या आजारावर अनेक दिवसांपासून उपचार घेत आहे.
आठ वर्षाच्या थेरपीनंतर सेशन संपलं
आठ वर्ष थेरपी घेतल्यानंतर आयरा खान आता या थेरपीच्या गोंधळातून पूर्ण मुक्त झाली आहे. तिने याबाबतची माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे. आयरा ही पुढील काही काळ औषधांवर असेल असं सांगण्यात आलं आहे.
आयरा खान पोस्टमध्ये काय म्हणते?
’13 ऑक्टोबर रोजी माझ्या थेरपीचा शेवटचा सेशन होता. 8 वर्षे आणि आठवड्यातून तीन वेळा मनोविश्लेषणानंतर आता मला थेरपीची गरज नाही. मग आता मी ठीक झाले का? मी अजूनही औषधांवर आहे आणि कदाचित आगामी काही काळासाठी औषधांवरच असेन.
आयुष्य अधिक चांगल्याप्रकारे जगू लागले
आता माझं आयुष्य मी अधिक चांगल्याप्रकारे जगू लागले आहे (माझ्यासाठी) आणि मी स्वत:चं मॅनेजमेंटही करू शकेन. जबाबदारीने स्वत:ची काळजी घेईन आणि आयुष्यात मजा करायला विसरणार नाही’, असं तिने म्हटलंय.
पोस्टमध्ये काय म्हटलंय?
पोस्टमध्ये पुढं बोलताना ती म्हणते की, जोपर्यंत ठीक होण्याची गोष्ट आहे, मी नैराश्यातून मुक्त होतेय आणि माझ्या औषधांमुळे मी भविष्यात येणाऱ्या नैराश्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकेन. जर मी ते करू शकले नाही, तर मी नक्कीच मदतीसाठी विचारेन.
थेरपीमध्ये ग्रॅज्युएशन केलं?
याला असं म्हणत नाहीत किंवा अशी कोणती गोष्ट अस्तित्वात नाही, पण तरीही मला ते म्हणायला आवडेल की.. मी थेरपीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि मी पास झाले.’ आयराने तिच्या घटस्फोटासाठी आई वडिलांना जबाबदार धरले आहे.