- Home
- Entertainment
- नागा चैतन्यनंतर समंथाने साऊथमधील 'या' दिग्दर्शकाला पटवलं, दोघांचे दिवाळीचे फोटो पाहिले तर म्हणाल अरे वाह
नागा चैतन्यनंतर समंथाने साऊथमधील 'या' दिग्दर्शकाला पटवलं, दोघांचे दिवाळीचे फोटो पाहिले तर म्हणाल अरे वाह
अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने चित्रपट निर्माता राज निदिमोरू आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याने त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

नागा चैतन्यनंतर समंथाने साऊथमधील 'या' दिग्दर्शकाला पटवलं, दोघांचे दिवाळीचे फोटो पाहिले तर म्हणाल अरे वाह
समंथा रूथ प्रभू ही कायमच माध्यमांच्या चर्चेत राहताना दिसून येत असते. आता परत एकदा ती माध्यमांमध्ये झळकलेले दिसून आली आहे. तिने दिवाळीचे फोटो शेअर केले असून त्यातून तिच्या नात्याचा खुलासा झाला आहे.
एका विवाहित दिग्दर्शकाला करतेय डेट
समंथा ही गेल्या काही दिवसांपासून एका विवाहित दिग्दर्शकाला डेट करत असल्याचं दिसून आलं आहे. आता त्याच्यासोबतच तिनं फोटो शेअर केल्यानं तिनं नात्यावर शिक्कामोर्बत केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
चित्रपट निर्माता राज निदिमोरू याच्यासोबत समंथाने साजरी केली दिवाळी
यावेळी समंथाने तिची दिवाळी ही चित्रपट निर्माता राज निदिमोरु याच्यासोबत साजरी केली आहे. तिने काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या.
दोघांनी कोणत्या रंगाचे ड्रेस घातले होते?
यावेळी दोघांनी वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस घातल्याचं दिसून आलं आहे. या फोटोंमध्ये समांथा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे, तर राज निळ्या रंगाचा कुर्ता घालून हसताना दिसतोय. त्याचे कुटुंबिय देखील या फोटोत असल्याचं पाहायला मिळत आहे.
समंथाने सोशल मीडियावर फोटो केले शेअर
समंथाने यावेळी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याचं दिसून आलं आहे. या फोटोंमध्ये तिनं तिच्या घराची झलकही दाखवली. हे फोटो शेअर करताना तिनं Filled with gratitude , म्हणत या सगळ्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
राज निदिमोरू कोण आहे?
राज निदीमोरु हा समांथाच्या 'द फॅमिली मॅन: सीझन २' या हिट वेब सिरीजचा सह-निर्माता आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या नात्याची चर्चा सुरू आहे. पण दोघांनीही अद्याप यावर भाष्य केलं नाहीये.

