Box Office Release १९th September: 'हे' ४ चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर झाले रिलीज
आज १९ सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर विविध धाटणीचे चित्रपट रिलीज झाले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील 'अजेय', 'जॉली एलएलबी ३', या चित्रपटांचा समावेश होतो.

Box Office Release १९th September: 'हे' ४ चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर झाले रिलीज
आज बॉक्स ऑफिसवर चित्रपट रिलीज झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या करिअरवर आधारित असणारा अजेय हा चित्रपट आजच रिलीज झाला. त्यानंतर जॉली एलएलबी ३ आणि निशांची हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर येणार आहेत.
अजेय
अजेय हा चित्रपट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या करिअरवर आधारित असून तो आजच बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. 'अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' हा चित्रपट अजय सिंग बिष्ट यांचा हिमालयीन गावापासून योगी आदित्यनाथ, एक साधू, आध्यात्मिक नेता आणि उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा उल्लेखनीय प्रवास दाखवला आहे. शंतनू गुप्ता यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.
जॉली एलएलबी ३
जॉली एलएलबी ३ हा चित्रपट आजच बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या चित्रपटात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार या दोघांच्या प्रमुख भूमिका आहेत. वकिलांच्या केसमध्ये आपण मात्र चित्रपट पाहताना नक्कीच हसून हसून पोट मात्र नक्कीच धराल.
मीराई
मीराई हा चित्रपट मागच्या आठवड्यात रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांनी चांगल प्रतिसाद दिला आहे. हा एक सुपर योद्धा म्हणून ओळखला जात असून हा चित्रपट २ तास ४९ मिनिटांचा आहे. ६० कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट असून बॉक्स ऑफिसवर तो चांगला चालला आहे.
The Conjuring: Last Rites
1964 मध्ये, Ed आणि Lorraine Warren हे बाळ असताना एका अँटीक मिररद्वारे होणाऱ्या अज्ञात आध्यात्मिक घटनेचा सामना करतात. Lorraine ला त्या मिररमध्ये एक अस्तित्व दिसते — त्यावर ती बेहोश होते आणि जन्मवेळेसचा प्रसंग सुरु होतो. बाळ मृत जन्माला येते पण Lorraine ची प्रार्थना करून तो पुन्हा जिवंत होतो. त्या बाळाला Judy नाव दिलं जातं.
दशावतार
जगात जेव्हा जेव्हा वाईटाचा उदय होतो तेव्हा देव नेहमीच त्याचा नाश करण्यासाठी अवतार घेतो. आजच्या काळात अधर्मावर धार्मिकतेच्या विजयाची ही कहाणी आहे. कोकण प्रदेशातील पारंपारिक लोकनाट्य प्रकार असलेल्या दशावतारमध्ये पौराणिक कथा, संगीत, नृत्य आणि संवाद यांचे मिश्रण आहे. कोकणातील भुताटकीच्या गोष्टीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी एकदम प्रभावी भूमिका केली असून त्यांच्या अभिनयाने मन जिंकलं आहे.

