MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत सोमवारपासून थरारक वळण, आताच जाणून घ्या नेमके काय होणार!

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत सोमवारपासून थरारक वळण, आताच जाणून घ्या नेमके काय होणार!

what will happen in pinga ga pori pinga : सोमवारपासून पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत एक थरारक वळण येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर या मालिकेतील रहस्य आणखी गडद होणार आहे. काय नेमके होणार हे आताच जाणून घ्या... 

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
| Updated : Jan 10 2026, 01:02 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
गावाकडे जाण्याचा बेत... अन्
Image Credit : pr

गावाकडे जाण्याचा बेत... अन्

कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत १२ जानेवारीपासून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक गूढ, अस्वस्थ करणारा आणि थरारक प्रवास. मनोजच्या मावसभावाच्या लग्नासाठी वल्लरी, मनोज आणि इंदू गावाकडे जाण्याचा निर्णय घेतात. लग्नानंतर इंदू काही दिवस गावीच थांबते, तर मनोज आणि वल्लरी रात्रीचा प्रवास करून घरी परतत असतात. वाटेत एका अनोळखी ठिकाणी वल्लरीला एक लहान मुलगी एकटी, आई-वडिलांशिवाय बसलेली दिसते. तिच्याशी संवाद साधण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न करताना वल्लरी आणि ती मुलगी एकमेकींपासून दुरावतात. घरी परतल्यानंतर नेहमी वेळेवर उठणारी वल्लरी सलग अठरा तास झोपून राहते आणि इथून सुरू होतो एक गूढ असामान्य बदल. पहा पिंगा गं पोरी पिंगा १२ जानेवारीपासून दररोज रात्री ११ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

24
ती पुन्हा दिसते
Image Credit : pr

ती पुन्हा दिसते

या घटनेनंतर वल्लरीचं वागणं मनोजसाठी अधिकच गोंधळात टाकणारं ठरतं. कधी मनोजला पाहून घाबरणं, कधी मध्यरात्री एकटक पाहत बसणं, तर कधी सकाळी रात्री घडलेल्या कोणत्याही घटनेची आठवण नसणं या सगळ्यामुळे मनोज अस्वस्थ होतो. संक्रांतीच्या निमित्ताने घरात आनंदाचं वातावरण असतानाच वल्लरीला तीच लहान मुलगी पुन्हा दिसते आणि तिला चक्कर येते. याच दरम्यान श्वेताचे बाबा घरात येतात आणि वल्लरीमध्ये झालेला बदल ओळखून पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल मनोजला देतात. घराच्या उंबरठ्यावर दुष्ट शक्तींना रोखणारं तोरण लावलं जातं, आणि त्यानंतर ती मुलगी घरात प्रवेश करू शकत नाही तेव्हाच उलगडतं एक धक्कादायक सत्य की ती साधी मुलगी नसून एक आत्मा आहे.

Related Articles

Related image1
Tata Sierra च्या बुकिंगमधून आश्चर्यकारक ट्रेंड समोर, या व्हेरायंटला जास्त पसंती!
Related image2
नेक्सॉन आणि ब्रेझाशी स्पर्धा, सर्वात स्वस्त लोकप्रिय असलेल्या या कारची किंमत वाढली
34
भयावह वळण
Image Credit : pr

भयावह वळण

घटनेचा उगम शोधण्यासाठी मनोज पुन्हा त्या जागेकडे जाण्याचा विचार करत असतानाच, एका निर्णायक रात्री वल्लरी तेजाकडे झोपायला जाते आणि तेव्हाच त्या आत्म्याला घरात शिरण्याची संधी मिळते. ती लहान मुलगी वल्लरीला मिठी मारून झोपी जाते.... आणि याच क्षणी वल्लरीमध्ये एक भयानक परिवर्तन घडतं.

44
झपाटलेली मुलगी
Image Credit : pr

झपाटलेली मुलगी

पुढच्या दिवशी वल्लरी स्वतःला ‘जीविका जीरापुरे’ असल्याचं वैदर्भी भाषेत सांगू लागते. प्रेक्षकांसाठी हा क्षण स्पष्ट करतो की वल्लरी झपाटली गेली आहे. ही आत्मा नेमकी कोण आहे? तिचा उद्देश काय? आणि वल्लरीला या अंधारातून बाहेर काढणं शक्य होणार आहे का? या सगळ्यांची उत्तरं ‘पिंगा’च्या आगामी भागांमध्ये उलगडणार आहेत.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mardaani 3 : राणी मुखर्जी पुन्हा भिडणार! 'मर्दानी ३'ची रिलीज डेट जाहीर; बेपत्ता मुलींचा शोध आणि काळजाचा ठोका चुकवणारा थरार
Recommended image2
उद्यापासून BIGG BOSS Marathi चा तुफान राडा, रंगतदार ग्रॅंड प्रीमियरचा रंगणार सोहळा!
Recommended image3
Raja Saab Day 1 Box Office Collection : प्रभासकडून कॉमेडी, हॉरर आणि थ्रीलरवर अपेक्षाभंग!
Recommended image4
नीना गुप्ता यांचं लग्न का मोडलं, कारण जाणून जाल घाबरून
Recommended image5
Marathi film world: गिरिजा ओकनंतर इंटरनेटवर धुमाकूळ घालतायत या अभिनेत्रीचे फोटो!
Related Stories
Recommended image1
Tata Sierra च्या बुकिंगमधून आश्चर्यकारक ट्रेंड समोर, या व्हेरायंटला जास्त पसंती!
Recommended image2
नेक्सॉन आणि ब्रेझाशी स्पर्धा, सर्वात स्वस्त लोकप्रिय असलेल्या या कारची किंमत वाढली
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved