'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत लग्नाची तारीख आणि शुभ मुहूर्त जाहीर केला आहे. 

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्रभर फेमस झाली. प्राजक्ता ही गेल्या काही दिवसांपासून तीच लग्न ठरल्यामुळं चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने लग्न करणार असल्याची खुशखबर दिली आहे. आता तिने तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

प्राजक्ताने इंस्टाग्रामवर काय टाकलं? 

प्राजक्ताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत पाहुण्यांमध्ये बसलेली दिसून आली आहे. प्राजक्ताने पारंपरिक पोशाखात परिधान केलेल्या ड्रेसमुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने तिच्या लग्नाची तारीख आणि वेळ जाहीर केली असून याबाबतची माहिती दिली आहे.

View post on Instagram

लग्नपत्रिका पूजा करताना शेअर केला व्हिडीओ 

लग्नपत्रिका पूजा करताना व्हिडीओ प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमधील पत्रिकेनुसार तिचे लग्न येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने पूजा केलेल्या पत्रिकेच्या बाजूला हळदी कुंकू दिसून आलं आहे. त्यामुळं ही तारीख फायनल ठरल्याचं दिसून येत आहे.

तारखेसोबतच मुहूर्त सांगितला 

लग्नपत्रिका शेअर करताना प्राजक्ताने केवळ तारीखच नाही तर मुहूर्त सांगितलं आहे. प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांचं लग्न २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून २४ मिनिटे या शुभ मुहूर्तावर लग्न सोहळा पार पडणार आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.