त्याचे चमचे त्याचे कान भरतात, गोविंदाच्या पत्नीचा खुलासा ऐकून पायाला येतील मुंग्या
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी एक मोठा खुलासा केला आहे. गोविंदाचे मित्र त्याचे कान भरतात आणि तो धार्मिक कार्यांवर लाखो रुपये खर्च करतो पण तिला आर्थिक मदत करत नाही, असे सुनीता यांनी म्हटले आहे.

त्याचे चमचे त्याचे कान भरतात, गोविंदाच्या पत्नीचा खुलासा ऐकून पायाला येतील मुंग्या
सुनीता आहुजा आणि गोविंदा हे कपल कायमच चर्चेत राहत असते. त्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या होत्या. त्यावरून ते माध्यमांमध्ये कायमच झळकताना दिसून आल्या आहेत.
गोविंदांबद्दल केला मोठा खुलासा
गोविंदांबद्दल त्याची बायको सुनीताने मोठा खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की, तो धार्मिक कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च करतो, पण तिला आर्थिक मदत करत नाही.
गोविंदाचे मित्र कसे आहेत?
गोविंदाला त्याची पत्नी यावेळी बोलताना म्हटली आहे. त्याला चांगली टीम भेटलेली नाही. त्याचे मित्रही चांगले नाहीत. ते त्याला चांगला सल्लाही देत नाहीत.' तिने त्याला त्यांच्यापासून लांब जाण्याचा सल्ला दिला आहे.
गोविंदांबद्दल केला मोठा खुलासा
सुनीताने यावेळी बोलताना म्हटलं आहे की, मी खरं बोलते म्हणून त्याची माणसं आवडत नाही. प्रत्येकजण माझ्याबद्दल त्याचे कान भरतो आणि तो प्रत्येकावर विश्वास ठेवतो. माझी एकच इच्छा आहे की, एक वृद्धाश्रम आणि प्राण्यांसाठी घर बांधावं.
तो मला पैसे देत नाही
मी हे माझ्या स्वतःच्या पैशाने करेन. मी गोविंदाकडून एकही रुपया घेणार नाही. कारण, तो मला पैसे देत नाही. त्याचे चमचे त्याचे कान भरतात. तो फक्त धार्मिक कार्यावर पैसे खर्च करतो'
गोविंदा आणि सुनिताचं लग्न कधी झालं?
गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी ११ मार्च १९८७ रोजी गुपचूप लग्न केलं. त्यांनी त्यांची मुलगी टीना हीच जन्म होईपर्यंत त्यांचं लग्न गुप्त ठेवलं होतं. या जोडप्याची मुलगी टीना आहुजाने तिच्या वडिलांप्रमाणेच चित्रपटांमध्ये पदार्पण केलं, पण तिला यश मिळालं नाही.

