आपण रस्त्यावर चुंबन घेत नाही, ऐश्वर्या रायचं मत ऐकून भावना होतील रोमांचक
आपला ५१ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनने सार्वजनिक प्रेम आणि विवाहपूर्व जवळीक यावर तिची मते मांडली आहेत. तिच्या मते, सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणे हे खाजगी आहे.

आपण रस्त्यावर चुंबन घेत नाही, ऐश्वर्या रायचं मत ऐकून भावना होतील रोमांचक
ऐश्वर्या राय बच्चन ही तिच्या सौंदर्यासाठी खासकरून ओळखली जाते. ती नेहमीच अवघड प्रश्नांना उत्तर देऊन अडचणीत सापडत असते. तिचे सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ दिसून येतात.
आज ऐश्वर्या रायचा ५१ वा वाढदिवस
आज ऐश्वर्या राय ही तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने सार्वजनिक प्रेमसंबंध आणि विवाहपूर्व जवळीक याबद्दल मत मांडली आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
सार्वजनिक ठिकाणच्या प्रेमाबद्दल ऐश्वर्या काय म्हणाली?
सार्वजनिक ठिकाणी व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रेमाबद्दल ऐश्वर्या रायने आपलं मत व्यक्त केलं होतं. लोक रस्त्यावर चुंबन घेत नाहीत, ही एक अतिशय खाजगी भावना असून ती सहसा दाखवली जात नाही.
लग्नाआधी शारीरिक संबंधावर ऐश्वर्या काय म्हणाली?
लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याच्या मुद्यावर ऐश्वर्या रायने आपलं मत व्यक्त केलं आहे. तिनं म्हटलं आहे की, भारतात ते पूर्णपणे निषिद्ध आहे. तिने भारतीय संस्कृतीशी सुसंगत प्रतिक्रिया दिली.
वैयक्तिक निर्णय म्हणून कशाचा केला उल्लेख?
"खरं सांगायचं तर, ही चांगली गोष्ट नाही. बदलत्या काळात याबद्दल अनेक युक्तिवाद केले जाऊ शकतात, परंतु भारतीय संस्कृती आणि परंपरांच्या बाबतीत ते शंकास्पद आहे. पण हा एक अतिशय वैयक्तिक निर्णय आहे."
निर्णय कसे घ्यायला हवेत?
आजचे तरुण त्यांच्या नातेसंबंधांबद्दल, शारीरिक आणि शाब्दिक जवळीकतेबद्दल खूप मोकळे आहेत. अशा परिस्थितीत, काय बरोबर आहे आणि काय चूक आहे याचा निर्णय त्याच व्यक्तीनेच घ्यावा. लग्नापूर्वी किंवा नंतर शारीरिक संबंध ठेवावेत की नाही हे तुमच्या भावनांवर अवलंबून असते.