MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Trisha Vitamin D : वयाच्या 40शी नंतर अभिनेत्री त्रिशा असं का करतेय? जाणून घ्या व्हिटॅमिन डीचं महत्त्व

Trisha Vitamin D : वयाच्या 40शी नंतर अभिनेत्री त्रिशा असं का करतेय? जाणून घ्या व्हिटॅमिन डीचं महत्त्व

त्रिशाने नुकतीच 'व्हिटॅमिन डीसाठी थोडा वेळ उन्हात' अशी एक पोस्ट शेअर केलीय, जी सध्या व्हायरल होतेय. वयाच्या ४० नंतर हाडं आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी का गरजेचं असतं?

3 Min read
Author : Karishma R
Published : Oct 06 2026, 01:48 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
उन्हाचा आनंद घेताना त्रिशा
Image Credit : Trisha Krishnan Instagram

उन्हाचा आनंद घेताना त्रिशा

स्टार अभिनेत्री त्रिशा सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे पर्सनल आणि प्रोफेशनल अपडेट्स इन्स्टाग्रामवर नेहमी शेअर करते. नुकतीच तिने व्हिटॅमिन डी बद्दल केलेली एक पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होतेय.

साऊथ क्वीन त्रिशाने (४३) नुकतेच सकाळच्या कोवळ्या उन्हात उभे असलेले तिचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंना तिने 'व्हिटॅमिन डीसाठी थोडा वेळ उन्हात' असं कॅप्शन दिलंय. तिची ही पोस्ट आता चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय.

त्रिशाने यावर जास्त काही लिहिलं नसलं, तरी वयाच्या ४० नंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचं ठरतं, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
४० नंतर व्हिटॅमिन डी का महत्त्वाचं?
Image Credit : X

४० नंतर व्हिटॅमिन डी का महत्त्वाचं?

वयाची ४० वर्षे ओलांडल्यानंतर हाडं, स्नायू आणि शरीराच्या चयापचय क्रियेत हळूहळू बदल होऊ लागतात. अशा वेळी शरीर कॅल्शियम योग्य प्रकारे शोषून घेईल, यासाठी व्हिटॅमिन डी मदत करतं. हाडांची मजबुती टिकवून ठेवण्यासोबतच स्नायू अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यात हे महत्त्वाची भूमिका बजावतं.

वय वाढतं तशी हाडांची घनता आणि स्नायूंची ताकद कमी होणं साहजिक आहे. यामुळे थकवा येणं, पडल्यास दुखापत होणं आणि हाडं मोडण्याचा धोका वाढतो. म्हणूनच शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी असणं खूप गरजेचं आहे, असा सल्ला डॉक्टर देतात.

Related Articles

Related image1
Aluminium Foil Medicine : गोळ्यांच्या पाठीमागे असलेलं सिल्व्हर फॉइल फक्त कव्हर नसतं, त्यामागचं खरं कारण माहितीये?
35
फक्त उन्हात बसणं पुरेसं आहे का?
Image Credit : Instagram

फक्त उन्हात बसणं पुरेसं आहे का?

सूर्यप्रकाश शरीरात व्हिटॅमिन डी तयार करायला मदत करतो. पण, सगळ्यांना एकाच प्रकारचं ऊन पुरेसं ठरेल असं नाही. त्वचेचा प्रकार, वय, हवामान, कपडे, राहण्याचं ठिकाण आणि प्रदूषण यांसारख्या अनेक गोष्टींचा व्हिटॅमिन डी तयार होण्यावर परिणाम होतो.

त्यामुळे फक्त उन्हात बसल्याने शरीराला आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी मिळेल, असा गैरसमज बाळगू नका. तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचा संशय आल्यास, रक्त तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. उन्हातून शरीराला नेमकं किती व्हिटॅमिन डी मिळतं, याचा अचूक अंदाज लावणं कठीण असल्याचं डॉक्टर सांगतात.

45
व्हिटॅमिन डी कमतरतेची लक्षणं काय?
Image Credit : Instagram@trishakrishnan

व्हिटॅमिन डी कमतरतेची लक्षणं काय?

व्हिटॅमिन डीची कमतरता असताना सगळ्यांमध्ये एकसारखीच लक्षणं दिसतील असं नाही. काहींमध्ये ही कमतरता थोडीच असेल, तर बऱ्याच काळापर्यंत कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत.

काहींना स्नायू दुखी, हाडांमध्ये वेदना, थकवा किंवा सतत गळून गेल्यासारखं वाटू शकतं. पण, ही लक्षणं फक्त व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेच येतात, असं ठामपणे सांगता येत नाही. इतर आरोग्य समस्यांमुळेही असं होऊ शकतं.

म्हणूनच नुसता थकवा जाणवतोय म्हणून मनानेच व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणं चुकीचं आहे. हाडं आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी योग्य प्रोटीनयुक्त आहार, नियमित व्यायाम आणि पुरेसा सूर्यप्रकाशही तितकाच गरजेचा आहे.

55
४० नंतर सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे का?
Image Credit : Asianet News

४० नंतर सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे का?

४० वर्षे ओलांडलेल्या प्रत्येकाने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतलीच पाहिजेत, असा कोणताही नियम नाही. टेस्टमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याचं निष्पन्न झाल्यावर किंवा डॉक्टरांनी सांगितल्यावरच ती घ्यावीत. व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. शरीरातील कॅल्शियमची पातळी असामान्यपणे वाढणं, हा त्यातीलच एक धोका आहे.

त्यामुळे ४० वर्षे पूर्ण झाली म्हणून मनानेच सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा, शरीराला खरोखर कशाची गरज आहे हे ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती घेणं उत्तम. त्रिशाच्या 'सन टाईम' पोस्टने व्हिटॅमिन डीच्या विषयाला पुन्हा एकदा चर्चेत आणलंय. पण आरोग्याच्या बाबतीत घरगुती उपायांपेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणंच सर्वात सुरक्षित ठरतं.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना पश्चिम बंगाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
Recommended image2
Kabir Bedi: वयाच्या ७० व्या वर्षी चौथ्यांदा बोहल्यावर चढला हा हँडसम व्हिलन, आता उलगडले लग्नाचे रहस्य
Recommended image3
Rajpal Yadav: चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवचे २५० कोटींचे नुकसान, सरन्यायाधीश म्हणाले...
Recommended image4
Rajpal Yadav : 5 कोटींच्या कर्जाने राजपाल यादवला कसा लावला 22 कोटींचा चुना? सुप्रीम कोर्टात अभिनेत्याची व्यथा
Recommended image5
Expensive House Of Celebs : 800 कोटींचा पतौडी पॅलेस ते जुहूचा बंगला; बॉलिवूड स्टार्सची 8 सर्वात महागडी घरं
Related Stories
Recommended image1
Aluminium Foil Medicine : गोळ्यांच्या पाठीमागे असलेलं सिल्व्हर फॉइल फक्त कव्हर नसतं, त्यामागचं खरं कारण माहितीये?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved