भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिचा मृत्यू मागील वर्षी संशयास्पद स्थितीत झाला होता. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई: भोजपुरी फिल्म इंडस्ट्री कायमच चर्चेत येत असते. त्यांचे गाणे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असून तेथील अभिनेते आणि अभिनेत्री कायमच माध्यमांमध्ये झळकत असतात. भागलपूरमध्ये भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मागील वर्षी तिचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.

राहत्या अपार्टमेंटमध्ये झाला होता मृत्यू 

मागील वर्षी २७ एप्रिल रोजी तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरात सापडला होता. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून मारल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी परत तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केल्यानंतलोकांच्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रकरणी अमृताचा नवरा, बहीण आणि इतर नातेवाईक तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

मालमत्तेच्या वादातून झाली हत्या 

मालमत्तेच्या वादातून हत्या झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. पण कोणतेही धागेदोरे म्हणजेच पुरावे पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे अजूनही संशय बळावलेला आहे. अभिनेत्री अमृता हिच्या मृत्यूमुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबाने आत्महत्या केल्याचा केला होता दावा 

यावेळी बोलताना कुटुंबाने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. अमृताने गळफास घेऊन आत्महत्या केली असं कुटुंबातील सदस्यांचे म्हणणं होत. यावेळी अमृताचा मृतदेह हा हॉलमधून बाहेर काढण्यात आला होता, अमृताच्या गळ्यावर निशाणी दिसून आली होती. त्यामुळं तिचा मृत्यू गळा दाबून तर नाही ना झाला असा संशय व्यक्त केला जात होता.

यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर वैद्यकीय मंडळाकडून सल्ला मागितला होता. पोलिसांनी यावेळी शवविच्छेदन अहवालातील हत्येच्या शक्यतेनंतर वैद्यकीय मंडळाकडून सल्ला मागितला होता. त्यामुळं पोलिसांनी तपासाची दिशा बदलून टाकली आहे. आता या तपासातून काय निष्पन्न होत ते लवकरच दिसून येईल.