प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळबंद २' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ८ ते १० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात ९० कोटींचा टप्पा ओलांडला असून, या प्रवासात शाहरुख खाननेही मदत केल्याचे समोर आले आहे.

मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटांच्या यादीमध्ये आता देऊळबंद २ या चित्रपटाचा खासकरून उल्लेख करावा लागणार आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. रिलीजच्या चौथ्या आठवडाअखेर या चित्रपटाने ९० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

टॉप ५ चित्रपटांमध्ये कमावले नाव 

सर्वात जास्त कमाई करणाऱ्या टॉप ५ चित्रपटांमध्ये देऊळ बंद २ चित्रपटाने नाव कमावले आहे. ८ ते १० कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती झाली होती. त्यानंतर या चित्रपटाने कमावलेली कमाई पाहून आपले डोळे पांढरे होतील. आपला हा चित्रपट आता १०० कोटींकडे धाव घेत असल्याचं दिसून आलं आहे.

शाहरुख खानने प्रवीण तरडे यांना केली मदत 

प्रवीण तरडे यांनी यावेळी शाहरुख खानने केलेल्या मदतीचा खासकरून उल्लेख केला आहे. हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी डिजिटल सिनेमा पॅकेज साठी तब्बल ४२ लाखांचं बिल आलं होत. ते बिल माफ करून शाहरुख खानने खूप मोठी मदत केल्याचा उल्लेख यावेळी प्रवीण तरडे यांनी केला आहे.

चित्रपट प्रेक्षकांना का आवडला? 

हा चित्रपट प्रेक्षकांना का आवडला हे सोशल मीडियावरून दिसून आलं. देऊळबंद या २०१५ साली आलेल्या चित्रपटाचा हा दुसरा पार्ट आहे. या चित्रपटामध्ये खासकरून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अंधश्रद्धा विरुद्ध अध्यात्म आणि स्वामींची महती सांगण्यात आली आहे. मोहन जोशी यांनी या चित्रपटात स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे.