सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या चिंकी आणि मिंकी या जुळ्या बहिणींनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी चाहत्यांचे आभार मानले असून नव्या प्रवासात साथ देण्याची विनंती केली आहे.

सोशल मीडियावरून फोटो, व्हिडीओ टाकून प्रसिद्धी मिळवण्याचं प्रमाण सध्याच्या काळात वाढत चाललं आहे. द रिबेल कीड नावाच्या कन्टेन्ट क्रिएटरवर लिहिलेली एक पोस्ट ट्विटरवर व्हायरल झाली आहे. यामध्ये लिहिणाऱ्या व्यक्तीनं एक क्रिएटर आणि एक आयआयटीएन यांच्यातल्या कमाईचा फरक सांगितलं आहे. नोएडा येथे जन्मलेल्या सुरभी आणि समृद्धी या दोन बहिणी क्रिएटर होत्या. त्यांनी सोशल मीडियावरून वेगळं होण्याची घोषणा केली आहे.

दोघीही होत्या जुळ्या बहिणी 

दोघीही बहिणी जुळ्या असल्यामुळं सोशल मीडियावर त्यांनी स्वतःची ओळख तयार केली. त्यांनी इंटरनेटवर स्वतःचा फॅन बेस तयार केल्यानंतर त्यांचे व्हिडीओ लोकांना मोठ्या प्रमाणावर आवडत असायचे. त्या दोघींचे नाव चिंकी आणि मिंकी होते. त्यांनी टिकटॉक सारख्या अँपवरून व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली होती.

एकसारखे हावभाव आणि नृत्य करत त्या मुलींनी स्वतःच्या अभिनयाची चाहूल सर्वांना दाखवून दिली होती. टिकटॉक या अँपवर बंदी आपल्यामुळे त्या दोघींनी इंस्टाग्रामचा वापर करायला सुरुवात केली. लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांना अनेक शोमधून ऑफर यायचा सुरुवात झाली. जून २०१९ मध्ये मध्ये त्या दोघी कपिल शर्माच्या शोमध्ये दिसल्या होत्या.

View post on Instagram

नवीन निर्णय घेऊन दिला धक्का

त्यांनी नवीन निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला आहे. ३ जुलै २०२५ रोजी आम्ही दोघी वेगळ्या होत असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर केलं. दोघीनींही यावेळी बोलताना चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, "'आपण एकत्र एक सुंदर प्रवास केला, पण आता स्वतःची ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे. हा निर्णय सोपा नव्हता, पण आवश्यक होता. आम्हाला एकमेकांविषयी नेहमीच प्रेम आणि आदर असेल. आशा आहे की तुम्ही आमच्या या नव्या प्रवासातही आम्हाला साथ द्याल."