- Home
- Entertainment
- Tanvi Patil Web Series : ''दोन पुरुष आणि मी.. पहिल्याच वेबसिरिजमध्ये टॉपलेस..'' मराठमोळी अभिनेत्री तन्वी पाटीलने शेअर केला अडल्ट वेबसीरिजमधील अनुभव
Tanvi Patil Web Series : ''दोन पुरुष आणि मी.. पहिल्याच वेबसिरिजमध्ये टॉपलेस..'' मराठमोळी अभिनेत्री तन्वी पाटीलने शेअर केला अडल्ट वेबसीरिजमधील अनुभव
मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील झगमगाट आणि अडल्ट वेबसीरिजमधील भडक दृश्यं या दोन परस्परविरोधी जगात अनेक कलाकारांना वावरावं लागतं. असाच अनुभव मराठमोळ्या अभिनेत्री तन्वी पाटील हिनं शेअर केला आहे, जो सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

दोन पुरुषांसोबत टॉपलेस लव्हमेकिंग सीन
तन्वी पाटील हिनं आपल्या पहिल्याच वेबसीरिजमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस लव्हमेकिंग सीन केला होता. त्या अनुभवाबद्दल ती म्हणते, "माझ्यासाठी हा सीन करताना मानसिकदृष्ट्या खूप अवघड होतं. पहिल्याच प्रोजेक्टमध्ये इतका भडक सीन करणं सोपं नव्हतं. पण नशीबाने माझे सहकलाकार समजूतदार होते. आम्ही एकत्र बसून एकमेकांशी संवाद साधला, काय-काय गोष्टींमध्ये कम्फर्टेबल आहोत हे स्पष्ट केलं. त्यामुळे शूटिंग दरम्यान थोडं सोपं झालं."
तन्वी पाटील पुढे स्पष्ट करते की, “फक्त अभिनेत्रींनाच नाही, तर अभिनेत्यांनाही अशा सीन्स करताना अवघड वाटतं. प्रत्येक सीन आधी योग्य संवाद साधूनच करायला हवा. अन्यथा तो सीन खोटा वाटतो, आणि प्रेक्षक ते लगेच ओळखतात.”
माझं काम माझ्यासाठी महत्त्वाचं
ती असंही सांगते की, "काही लोकांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की असं का करतेयस? पण मला वाटतं, मी नशीबवान आहे की मला काम मिळतंय. इंडस्ट्रीमध्ये अनेक मुली आहेत, ज्या मेहनत करताहेत, पण त्यांना संधीच मिळत नाही. काम मिळतंय, पोटापाण्याची चिंता नाही, हीसुद्धा एक मोठी गोष्ट आहे."
तन्वी पाटील तिच्या सामाजिक आयुष्याबद्दलही प्रांजळपणे बोलते. ती म्हणते, “जे माझ्या कामाबाबत किंवा भडक भूमिकांबाबत गैरसमज पसरवतात, गॉसिप करतात, त्यांच्यापासून लांब राहणंच योग्य आहे. असे लोक खरंतर मैत्री करण्याच्या लायकीचे नसतात. मी प्रसिद्ध आहे, मला काही फरक पडत नाही. लोकं बोलणारच, पण माझं काम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
कलाकाराचा संघर्ष
तन्वी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय आहे. तिने तिच्या विविध वेबसीरिजमध्ये ग्लॅमरस आणि भडक भूमिकांमधून स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. ती नेहमी तिचे फोटो आणि अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असते.
या सगळ्या अनुभवांवरून असं स्पष्ट होतं की, अभिनय हा केवळ ग्लॅमरचा खेळ नसून, त्यामागे असतो एक कलाकाराचा संघर्ष, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमतेचा प्रवास. तन्वी पाटीलसारख्या अभिनेत्री या वाटचालीचं उदाहरण ठरतात.
तन्वी पाटील यांच्या इन्स्टा अकाऊंटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा…

