Sonakshi Sinha Pregnancy : सोनाक्षी सिन्हा नुकत्याच एका कार्यक्रमात पती झहीरसोबत दिसली. वारंवार पोट झाकत असल्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आले आहे. या जोडप्याने अद्याप या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Sonakshi Sinha Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला नुकतंच एका कार्यक्रमात पती झहीर इक्बालसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी या जोडप्याने तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना मनसोक्त पोज दिल्या. मात्र, यावेळी ती वारंवार आपलं पोट झाकताना दिसली, ज्यामुळे लोक तिच्या प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावू लागले.

सोनाक्षी सिन्हाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे खास?

आता सोनाक्षीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये सोनाक्षीने लाल आणि पांढऱ्या रंगाचा भरतकाम केलेला अनारकली सूट घातला होता, ज्यावर फुलांची नाजूक डिझाइन होती. तिने यासोबत मॅचिंग लाल रंगाची ओढणीही घेतली होती. तर झहीरने क्लासिक काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. अशातच त्यांना पाहून लोकांनी सोनाक्षी प्रेग्नेंट असल्याचे म्हटले. तर काही लोकांनी तिच्या चेहऱ्यावरचा प्रेग्नेंसी ग्लो दुर्लक्षित करता येणार नाही, असेही म्हटले. मात्र, सोनाक्षी आणि झहीरने अद्याप या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण लोकांना खात्री आहे की ते लवकरच पालक होणार आहेत. काही लोकांनी असेही म्हटले की, सोनाक्षीने फोटोग्राफर्सना पोज देताना आपला बेबी बंप हाताने लपवण्याचा प्रयत्न केला होता.

View post on Instagram

कधी झाले होते सोनाक्षी-झहीरचे लग्न? 

सोनाक्षी आणि झहीरच्या या व्हिडिओवर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एकाने विचारले, 'ती प्रेग्नेंट दिसत आहे.' दुसऱ्याने म्हटले, 'तिच्या चेहऱ्यावर ग्लो आहे, ती नक्कीच प्रेग्नेंट आहे.' सोनाक्षीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आणि झहीरसोबतच्या लग्नानंतर नेटकरी ती लवकरच आई होणार असल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र, तिने नेहमीच या चर्चा फेटाळून लावल्या आहेत आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल मतं बनवणाऱ्या ट्रोलर्सना फटकारले आहे.

सोनाक्षी आणि झहीरने २३ जून २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथे त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. यानंतर त्यांनी एका भव्य रिसेप्शनचे आयोजन केले होते, ज्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते.