ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चंदेकर यांचे निधन झाले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेजस्विनी पंडित यांनी आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. ज्योती चंदेकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते.

तेजस्विनी पंडिताच्या आईच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्री ज्योती चंदेकर यांच्या अंत्यविधीच्या दर्शनासाठी राज ठाकरे हे पोहचले होते. आईच्या अंत्यविधीला तेजस्विनी पंडित यांनीच अग्नी दिला. त्यांना अखेरचा निरोप देताना तेजस्वी पंडित ढसाढसा रडताना दिसून आली. ज्योती यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये भूमिका केल्या होत्या. सिंधुताई सपकाळ या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका सगळ्यांना प्रचंड आवडली होती.

तेजस्विनी पोस्टमध्ये काय म्हणते? 

तेजस्विनी पोस्टमध्ये लिहिते की, ‘ज्योती बेटा.. आता तिकडे माईची हुबेहूब भूमिका कोण साकारणार बरं?’ ज्योती यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला होता. तेजस्विनीची पोस्ट पाहून अनेकांना गहिवरून आले होते. अनेक प्रेक्षकांनी ही पोस्ट पाहून भरून आलं असं म्हटलं आहे. ज्योती चंदेकर यांच्या मृत्यूनंतर अनेकांना धक्का बसला आहे.

ज्योती अभिनयात कशा आल्या? - 

ज्योती यांच्या अभिनयाची सुरुवात एका हिंदी चित्रपटातून झाली होती. ज्योती या वडिलांसोबत गेल्या असताना त्यांना दिग्दर्शकाने काही ओळी वाचायला दिल्या आणि त्या वाचल्यानंतर त्यांना एक भूमिका मिळाली. त्यांनी त्या वाचून दाखवल्यानंतर त्यांना एक भूमिका मिळाली होती. या भूमिकेत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं होतं.

कोणत्या नाटकांमध्ये काम केलं होत? -

मित्र या नाटकामध्ये श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी निभावलेली भूमिका प्रचंड गाजली होती. ज्योती चांदेकर यांनी ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम’ यांसारख्या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. ज्योती चांदेकर यांना तेजस्विनी पंडित आणि अजून एक मुलगी होती.