- Home
- Entertainment
- Rashmika Mandanna : 'छावा'तील 'श्रीसखी'चा 21 व्या वर्षी साखरपुडा, ब्रेकअप, नॅशनल क्रश असा आहे ग्लॅमरस प्रवास!
Rashmika Mandanna : 'छावा'तील 'श्रीसखी'चा 21 व्या वर्षी साखरपुडा, ब्रेकअप, नॅशनल क्रश असा आहे ग्लॅमरस प्रवास!
Rashmika Mandanna : वयाच्या 21 व्या वर्षी साखरपुडा, त्यानंतर लगेच ब्रेकअप... वैयक्तिक आयुष्यातील या मोठ्या धक्क्यातून सावरत, मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत, एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन आज ती पॅन इंडिया स्टार बनली आहे.

21 व्या वर्षी साखरपुडा, अचानक ब्रेकअप
आयुष्यात संधी चालून येत नाहीत, आपल्यालाच त्यांचा पाठलाग करावा लागतो. एकदा अपयश आले म्हणून मागे हटल्यास यश मिळत नाही. हेच एका अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातून सिद्ध केले आहे. वयाच्या 21 व्या वर्षी साखरपुडा आणि त्यानंतर लगेच ब्रेकअप... वैयक्तिक आयुष्यातील या वादळाला तिने टर्निंग पॉईंट बनवले आणि एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत ती आज टॉपला पोहोचली आहे. आज तिने पॅन इंडिया अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना
'नॅशनल क्रश' रश्मिका मंदान्नाबद्दल वेगळं सांगायला नको. टॉलीवूडपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या क्यूट अंदाजाने तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 'पुष्पा' चित्रपटामुळे ती नॅशनल क्रश बनली, तर रणबीर कपूरसोबतच्या 'ॲनिमल' चित्रपटाने तिने नवीन रेकॉर्ड केले. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 900 कोटींहून अधिक कमाई करून रश्मिकाची क्रेझ आणखी वाढवली.
बॉलिवूडमध्येही रश्मिकाची खास क्रेझ
यानंतर, 'पुष्पा-2: द रुल' मध्ये अल्लू अर्जुनसोबत काम करून तिने संपूर्ण भारताला वेड लावले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तसेच, हिंदीमध्येही तिला अनेक ऑफर्स मिळत असून ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता ती एका हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच तिने एका मोठ्या चित्रपटाला होकार देऊन चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. अशाप्रकारे ती पॅन-इंडिया स्तरावर चमकत आहे.
ब्रेकअपमुळे ठरली होती चर्चेचा विषय
आज स्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी रश्मिका एकेकाळी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. करिअरच्या सुरुवातीलाच साखरपुडा करून अचानक नाते तोडल्याने मोठी खळबळ उडाली होती. 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटाच्या वेळी तिची आणि अभिनेता रक्षित शेट्टीची ओळख झाली, ज्याचे रूपांतर प्रेमात झाले. 2017 मध्ये दोघांनी घरच्यांच्या संमतीने साखरपुडा केला. त्यावेळी रश्मिका फक्त 21 वर्षांची होती.
एकापाठोपाठ एक ऑफर्सनी मिळवले स्टारडम
ब्रेकअपनंतर रश्मिकाच्या करिअरने वेग घेतला. 'चलो' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिला एकापाठोपाठ एक तेलुगू चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. 'गीता गोविंदम'ने तिला प्रचंड यश मिळवून दिले. ब्रेकअपमुळे खचून न जाता रश्मिका अधिक फोकस झाली. आज 'पुष्पा'सारख्या मोठ्या चित्रपटामुळे तिला राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. बॉलिवूडमध्येही ती यशस्वी ठरली असून, खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया अभिनेत्री बनली आहे. 21 व्या वर्षी साखरपुडा आणि नंतर ब्रेकअप... हाच तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.

