Rakhi Sawant ची बिघडली प्रकृती, अभिनेत्री हृदयाच्या गंभीर आजारने ग्रस्त? जाणून घ्या प्रकरण

| Published : May 15 2024, 07:21 AM IST / Updated: May 15 2024, 07:24 AM IST

rakhi sawant hospitalised

सार

Rakhi Sawant Health Update : बॉलिवूडमधील अभिनेत्री राखी सावंतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये राखी सावंतची प्रकृती बिघडली असून रुग्णालयात दाखल केल्याचे दिसून येत आहे.

Rakhi Sawant Health Update : बॉलिवूडमधील अभिनेत्री राखी सावंतचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंनी सर्वांना धक्का बसला आहे. रिपोर्ट्सनुसार, राखी सावंतची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर राखीचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाले असून त्यावर आता चाहत्यांनी प्रश्न उपस्थितीत केले आहेत.

नक्की काय झालेय राखीला?
राखी सावंतचे व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ती रुग्णालयातील एका बेडवर झोपल्याचे दिसून येत आहे. तिचे डोळेही बंद आहेत. डाव्या बोटांवर एक पल्स ऑक्सीमीटर लावण्यात आला असून एक नर्स तिची काळजी घेताना दिसतेय.

दरम्यान, अद्याप स्पष्ट झालेले नाही राखी सावंतला नक्की काय झालेय. पापाराजी विरल भयानी (Viral Bhayani) यांनी राखी सावंतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोखाली लिहिलेय की, तिला हृदयासंबंधित आजारामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

चाहते चिंतेत पडले
सोशल मीडियावर राखीची फोटोमधील प्रकृती पाहता चाहते चिंतेत पडले आहेत. इंस्टाग्रामवर चाहत्यांकडून राखीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.एका युजरने लिहिले की, 'राखी लवकर बरी हो.', दुसऱ्याने म्हटले की, "ती कशीही असू दे, पण रुग्णालयात कोणीही दाखल होऊ नये."

युजर्सने दिल्या अशाही प्रतिक्रिया
राखीच्या फोटोंवर काहींनी प्रतिक्रिया देत म्हटले की, ती नाटक करत आहे. एका युजरने लिहिले की, "देवा रुग्णालयाला तिला सहन करण्याची शक्ती दे.", दुसऱ्या युजरने लिहिले की, "ड्रामेबाज आहे." दरम्यान, राखी सावंतच्या लाल रंगातील टॉवेलमधील लुकची जोरदार चर्चा झाली. याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

आणखी वाचा : 

ना पठाण आणि ना पुष्पा...रणबीरचा 'रामायण' सिनेमा ठरणार भारतीय सिनेसृष्टीतल सर्वाधिक महागडा सिनेमा, बजेट आले समोर

तब्बूची अमेरिकन टीव्ही सीरिजमध्ये एण्ट्री, मिळाला हा मोठा प्रोजेक्ट