जुही बब्बरने रक्षाबंधनानिमित्त सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिचा सावत्र भाऊ प्रतीक बब्बर कुठेही दिसत नाहीये. प्रतीकने नुकतेच लग्न केले पण कुटुंबातील कोणालाही बोलावले नव्हते, त्यामुळे कुटुंबात वाद असल्याचे दिसून येत आहे.

राखी पौर्णिमा हा बहीण भावाच्या नात्यातील सर्वात महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. या सणाला बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ त्याबदल्यात ओवाळणी देत असतो. आता बब्बर कुटुंबातील एक घटना समोर आली आहे. विख्यात ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बर सोनी हिने रक्षाबंधनच्या दिवशी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिचा सावत्र भाऊ प्रतीक बब्बर कुठेही दिसत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होतं.

जुहीने सोशल मीडियावर फोटो केला शेअर 

जुहीने सोशल मीडियावर फोटो शेअर करून मन मोकळं केलं आहे. यावेळी तिच्या फोटोंमधील लोक हसत असले तरीही तिच्या इमोजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या इमोजीमध्ये मनातील कोणतेही भाव समजत नसल्याचं दिसून आलं आहे. या फोटोंमध्ये तिचा भाऊ प्रतीक दिसत नसून त्याबद्दल तिची इमोजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रतिकने लग्नाला कोणालाच बोलावले नव्हते 

प्रतिकने काही दिवसांपूर्वी लग्न केलं पण त्यानं बब्बर कुटुंबातील एकही व्यक्तीला आपल्या लग्नाला बोलावले नव्हते. जुहीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘ काही सेलिब्रेशन पूर्ण असतात.. तर काही अधुरी वाटतात. आज रक्षाबंधन आहे, आणि मनात आनंद तर आहे, पण माझ्या हृदयाचा एक भाग अजूनही गायब आहे. पण आयुष्य पुढे जातच असतं.. आणि रक्ताची नाती कोणी बदलू शकत नाही. खरं रक्त कायम (सोबत) राहतं’

View post on Instagram

प्रतिकने कुटुंबासोबत तोडले 

संबंध प्रतिकने कुटुंबासोबत संबंध तोडले असून तो आता कोणाच्याही संपर्कात नसल्याचं दिसून आला आहे. प्रतीक हा राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. तो त्याच्या कुटुंबासोबत राहत होता पण एप्रिल महिन्यापासून तो कुटुंबापासून वेगळा राहायला लागला. त्यानंतर जुहीने एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘राज बब्बरजींची तीन मुले… जुही, आर्या आणि प्रतीक. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही.’