अभिनेत्री प्रिया बापट 'अंधेरा' या वेबसिरीजमधील लेस्बियन किसिंग सीनमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुरवीन चावलासोबतचा हा सीन वादग्रस्त ठरला असून, याआधीही 'सिटी ऑफ ड्रिम्स' मध्ये तिने असाच सीन दिला होता.

मुंबई: अभिनेत्री प्रिया बापट ही अनेकवेळा वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत येत असते. तिने हिंदी चित्रपटसृष्टी आणि वेबसिरीज विश्वामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हिंदी वेबसिरीज मध्ये काम करताना तीने अनेक वादग्रस्त सीन दिल्यामुळं वादात सापडली होती. सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसिरीजमधील तिचा लेस्बियन किसिंग सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

परत एकदा वादग्रस्त सीनमुळे आली चर्चेत 

प्रिया बापटने परत एकदा वादग्रस्त सीन दिल्यामुळे ती परत एकदा चर्चेत आली आहे. Andhera या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट पुन्हा एकदा लेस्बियन किसिंग सीन देताना पाहायला मिळाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक मिळावेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे सीन शूट केले जातात. या वेबसिरीजमध्ये प्रिया एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होती.

कोणासोबत दिला किसिंग सीन? 

या सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. सुरवीन चावला आणि प्रिया बापट या दोघींनी यामध्ये किसिंग सीन दिला आहे. यावेळी बोलताना प्रियाने मत व्यक्त केलं आहे. ती म्हणते की, "“मी पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये काम करतेय आणि हा अनुभव खूप वेगळा ठरला. संपूर्ण सीरिजचे शूटिंग रात्री झाले, तरी कथा इतकी रंगतदार होती की, शूटिंगदरम्यान थकवा जाणवला नाही. कथा वेगवेगळ्या स्तरांवर उलगडत जाते, त्यामुळे ही भूमिका अभिनयासाठी आव्हानात्मक ठरली.

यात अॅक्शन सिक्वेन्स आहेत, भीतीदायक प्रसंग आहेत आणि कलाकार म्हणून हे साकारताना खूप मजा आली. आतापर्यंत मी राजकारणी, वकील अशा विविध भूमिका केल्या आहेत; मात्र या सीरिजमध्ये पूर्णपणे नवी भूमिका करत आहे. मराठीत जसं मला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, तसंच प्रेम हिंदी प्रोजेक्ट्समध्येही मिळत असल्याचा मला आनंद आहे. वर्दीतील माझ्या या भूमिकेवरही प्रेक्षक तितकंच प्रेम करतील, याची मला खात्री आहे.”

याआधी दिला होता असा सीन 

प्रिया बापट यांनी “City of Dreams” या राजकीय थ्रिलर वेब सिरीजमध्ये दिलेला लेस्बियन किसिंग सीन खूप वादग्रस्त ठरला होता. या सीनमुळे सिरीजपेक्षा हा प्रसंगच जास्त चर्चेत आला. या सीनमुळे प्रिया बापट परत एकदा वादात सापडली होती.