अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्डा यांनी गोड बातमी दिली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याने सोशल मीडियावरून बाळाच्या येण्याची घोषणा केली आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्डा या दोघांनी गुड न्यूज दिली आहे. परिणीती लवकरच आई होणार असल्याची बातमी त्यांनी दिली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये परिणीती आणि राघव या दोघांच लग्न झालं होतं. त्या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर शेअर केला फोटो 

सोशल मीडियावर राघव आणि परिणीती या दोघांनी फोटो शेअर केले आहेत. त्यांनी केकचा फोटो यावेळी शेअर केला आहे. त्यावर त्यांनी लिहिताना १+१=३ असं लिहिलेलं असून त्यावर लहान बाळांच्या पावलांचे चित्रही काढण्यात आलं आहे. परिणितीने बोलताना सांगितलं की, ज्यात ते दोघे हातात हात घेऊन चालताना दिसतायंत.

अभिनेत्रीने काय म्हटलं? 

'आमचे चिमुकले विश्व... लवकरच (बाळाचे) आगमन होणार आहे. आम्हाला खूपच भाग्यवान आहोत.' असं परिणीती चोप्राने पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर दोघांवर आनंदाचा वर्षाव करण्यात आला आहे. आता राघव आणि परिणीती या काळात कुठं फिरायला जातात याकडं फॅन्सचे लक्ष लागून राहील आहे.

प्रियांका चोप्राची परिणीती बहीण 

प्रियांका चोप्राची परिणीती ही बहीण आहे. प्रियांका अमेरिकेत राहत असून तिचा नवरा निक जोनास आहे. तिला आणि निकला एक मुलगी असून तिघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रियांका आणि परिणीती या दोघांचा लहानपण सोबतच गेलेलं आहे.