Navri Mile Hitlerla : रेवतीला त्रास देणाऱ्या मुलाची तक्रार करायला गेलेल्या लीलासमोर पोलिसाचे उघडणार सत्य, विक्रांतचा खोटारडेपणा येणार समोर?

| Published : Apr 03 2024, 01:45 PM IST / Updated: Apr 03 2024, 01:52 PM IST

Navri Mile Hitlarla
Navri Mile Hitlerla : रेवतीला त्रास देणाऱ्या मुलाची तक्रार करायला गेलेल्या लीलासमोर पोलिसाचे उघडणार सत्य, विक्रांतचा खोटारडेपणा येणार समोर?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

रेवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर लीलाने पोलिसात धाव घेतली आहे. येथे आल्यानंतर पोलिसांना बहिणीला एक मुलगा त्रास देतोय अशी तक्रार करणार तोवर तिला समोर जे काही दिसते ते पाहून हैराण होते.

Navri Mile Hitlerla EP 17 Previwe : ‘नवरी मिळे हिटरला’ मालिकेत रेवतीने आत्महत्या केल्यानंतर तिला तातडीने लीला रुग्णालयात दाखल करते. येथील डॉक्टर लीलाला बहिणीने आत्महत्या केलीय का असे विचारत पोलिसात आधी तक्रार दाखल करायला सांगतात. लीला डॉक्टरांना गयावया करून बहिणीचा जीव वाचवण्यास सांगते. त्यावेळी रुग्णालयात मित्राला पाहण्यासाठी आलेला अभिराम लीलाला पाहतो. यावेळी अभिराम डॉक्टरांना लीलाची बहिण रेवतीवर उपचार करण्यास सांगतात.

दुसऱ्या बाजूला रेवतीचे आई वडील घरी येतात. त्यावेळी लीलाला पाहण्यासाठी तिची आई खोलीत जाते त्यावेळी जमिनीवर रक्त पडल्याचे दिसून येते. याचा आळ लीलावर घेतला जातो. अशातच रेवतीची आई घाईघाईने रुग्णालयात दाखल होते आणि लीलाच सुनावण्यास सुरूवात करते. यावर लीलाला काहीही विचारू नको असे रेवती मावशी आईला सांगते. यावेळी रेवती मावशी आईला खोट कारण देते. अशातच लीलाला रेवतीला तू खोट का बोललीस असे विचारते. यावर रेवती लीलाला आईला माझ्यापेक्षा तुझी किती काळजी करतेय याचा विचार करण्यास सांगते. याशिवाय लीला मी विक्रांत शिवाय जगूच शकत नाही असे म्हणते. पण रेवतीच्या मनात विक्रांतबद्दलचा राग अजूनच वाढला जातो.

लीलाची पोलिसात धाव
रेवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामागे तिला एक मुलगा त्रास देत असल्याचे कारण घेऊन लीला पोलीस स्थानकात येते. येथे आल्यानंतर पाठमोरा उभ्या असणाऱ्या एका पोलिसाकडे पाहून त्याला रेवतीला एक मुलगा त्रास देतोय असे सांगते. तेवढ्याच विक्रांत मागे वळतो. विक्रांतला पाहून रेवतीला धक्का बसतो. यावेळी  विक्रांत रेवतीला माझ्या आणि लीलामध्ये येऊ नकोस अशी धमकीही देतो. यानंतर विक्रांत रेवतीच्या घरी पोलिसाच्या वर्दीत लीलाला पाहण्यासाठी येतो. त्यावेळी नक्की काय घडले असे विचारतो. पण याचवेळी विक्रांतच्या हाताला लागलेल्या दुखपतीकडे रेवतीच्या वडिलांचे लक्ष जाते आणि त्याबद्दल विक्रांतला विचारले जाते. यावर आता विक्रांत काय उत्तर देणार, विक्रांतचे सत्य उघड होणार का हे आजच्या भागातून कळणार आहे.

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Navri Mile Hitlerla : रेवतीचा जीव वाचवण्यासाठी अभिराम हिटलर करणार लीलाची मदत ?पहा आजच्या एपिसोडमध्ये

‘पुष्पा 2: द रूल’ :अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत वाढवली चाहत्यांमधील उत्सुकता

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ; कलर्स मराठी वाहिनीवर नव्या मालिकेतून येताय विनोदाचे हे तीन हुकमी एक्के