मृणाल ठाकूरने एका मोठ्या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे तिच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये तिने एका अभिनेत्रीवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याआधीही बिपाशा बसूवर केलेल्या टिकेमुळे ती वादात सापडली होती.
अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत येत असते. तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये तिने एक मोठा सिनेमा नाकारल्याचे म्हटलं आहे. तिने त्या व्हिडिओमध्ये एका अभिनेत्रीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वादाला मात्र तोंड फुटलं आहे. याआधी अभिनेत्री बिपाशा बसूवर मृणाल ठाकूरने केलेल्या टिकेमुळं वाद झाला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये मृणाल काय म्हणाली?
अभिनेत्री मृणाल ठाकूर या व्हिडिओमध्ये म्हटली की, “खूप वेळा मला संधी मिळाली, पण मी नाही म्हटलं कारण मी तयार नव्हते. जर स्वीकारलं असतं तर वाद झाले असते. तो चित्रपट सुपरहिट झाला आणि त्या अभिनेत्रीला खूप फायदा झाला. पण नंतर मला जाणवलं की जर मी त्या वेळी तो चित्रपट केला असता, तर मी स्वतःलाच हरवलं असतं.”
प्रोजेक्ट न केल्यामुळं झाला फायदा
तो प्रोजेक्ट न केल्यामुळे तिला पुढे फायदा झाला. ती म्हणाली, “जिने तो चित्रपट केला ती अभिनेत्री आता काम करत नाही, पण मी अजूनही काम करतेय, हेच माझं यश आहे. मला तात्काळ प्रसिद्धी किंवा ओळख नको आहे, कारण जे पटकन मिळतं ते पटकन हरवतंही.” हे वक्तव्य केल्यानंतर प्रेक्षकांनी ही अभिनेत्री कोण असेल याचा अंदाज लावायला सुरुवात केली.
अनुष्का कपूरवर केली टीका
मृणाल ठाकूरने अनुष्का कपूरवर टीका केल्याचं स्पष्ट झालं आहे. मृणाल ठाकूर सुलतान चित्रपटाबद्दल आणि अनुष्का शर्माबद्दल बोलत असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये तीने एकदा मला सुलतान चित्रपट भेटला होता पण शेवटी अनुष्काची निवड झाल्याचं म्हटलं होतं. यावरून प्रेक्षकांनी हा अंदाज लावल्याचं म्हटलं आहे.
मृणालने बिपाशा बासूवर केली होती टीका
काही दिवसांपूर्वी तिचा अभिनेता अर्जित तनेजासोबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तिने बिपाशा बासूच्या शरीरयष्टीवर भाष्य केले होते. त्या व्हिडिओत मृणाल म्हणाली होती, “तुला पुरुषी दिसणारी आणि मसल्स असलेली मुलगी लग्नासाठी हवी आहे का? तर मग बिपाशाशी लग्न कर.” पुढे ती म्हणाली, “सांगते, मी बिपाशापेक्षा खूप चांगली आहे, ओके?” यावेळी मृणाल ठाकूर फॅन्सकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल्स झाली होती.
