सार

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सिनेमा क्षेत्रातील मिथुन चक्रवर्तींच्या योगदानासाठी त्यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

Mithun Chakraborty To Be Honoured With Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे, सूचना आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, दिग्गज अभिनेते मिथुन यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्काराने गौरवण्यात येणारआहे. 74 वर्षीय मिथुन चक्रवर्तींनी हिंदी सिनेमातील करियरमध्ये 48 वर्षे पूर्ण केली आहेत. आजही मिथुन चक्रवर्ती सिनेमांमध्ये काम करताना दिसतात.

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार
अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, “मिथुन दा यांच्या उल्लेखनीय सिनेमातील प्रवास पिढ्यांना प्रेरणा देते. ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की, मिथुन चक्रवर्तींना त्यांच्या भारतीय सिनेमातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित केला जात आहे”  मिथुन चक्रवर्तींना हा पुरस्कार 70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारावेळी प्रदान केला जाणार आहे. 8 ऑक्टोंबरला पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

पद्म भूषण पुरस्कारानेही गौरव 
कोलकाताच्या लहान वस्तीमधून आज बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सरपर्यंतचा केलेला यशस्वी प्रवास मिथुन चक्रवर्तींसाठी सोपा नव्हता. सिनेसृष्टीत यश मिळवण्यासाठी आयुष्यात मिथुन चक्रवर्तींनी अनेक अडथळ्यांचा सामना केलाय. मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्याची बातमी त्यांना पद्म भूषण पुरस्कार मिळाल्याच्या काही महिन्यानंतर समोर आली आहे. पद्म भूषण पुरस्कार सोहळा एप्रिल महिन्यात झाला होता. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

सिनेसृष्टीती मिथून चक्रवर्तींचा प्रवास
मिथुन चक्रवर्तींनी वर्ष 1976 मध्ये एका लहान भूमिकेपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. ‘दो अजनाने’ सिनेमात खरंतर लहान भूमिका केली होती. यानंतर वर्ष 1977 मध्ये आलेल्या सिनेमात मुख्य भूमिका मिळाली होती. पहिला सिनेमा ‘मृगया’ साठी मिथुन चक्रवर्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वर्ष 1982 मध्ये डिस्को डान्सर सिनेमातून मिथुन चक्रवर्तींच्या चाहत्यांमध्ये खूप मोठी वाढ झाली. या सिनेमाने जगभरात धमाकेदार कमाई केली होती.

मिथुन चक्रवर्तींचे सिनेमे
मिथुन चक्रवर्ती सध्या ‘ओह माय गॉड’ सिनेमात झळकले होते. याशिवाय अन्य सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी करियरमध्ये ‘अग्निपथ’, ‘मुझे इंसाफ चाहिए’, ‘हम से है जमाना’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘घर एक मंदिर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की’ सह काही सिनेमांमध्ये काम केले आहे.

आणखी वाचा : 

करण वीर मेहरा ठरला 'खतरों के खिलाडी 14' चा विजेता, ट्रॉफीसह किती मिळाली रक्कम?

राणी मुखर्जी यांना 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी IIFA पुरस्कार