Mithun Chakraborty Health Update : जेष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांच्या हेल्थबद्दल दिग्दर्शक पथिकृत बसू यांनी दिली अपडेट

| Published : Feb 11 2024, 11:52 AM IST

Mithun Chakraborty Health Update

सार

जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्तींना Ischemic Cerebrovascular Stroke चे निदान झाल्याची माहिती रुग्णलायकडून देण्यात आली आहे. अशातच दिग्दर्शक पथिकृत बसू यांनी मिथुन यांच्या हेल्थबद्दल एक अपडेट दिली आहे.

Mithun Chakraborty Health Update : बॉलिवूडमधील सुपरस्टार मिथुन चक्रवर्तींना कोलकाता (Kolkata) येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चक्रवर्तींच्या छातीमध्ये तीव्र स्वरुपात वेदना होत असल्याने त्यांची प्रकृती बिघडली गेली.

दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मिथुन चक्रवर्तींना ब्रेन स्ट्रोक झाल्याची माहिती दिली जात होती. रुग्णालयाकडून मिथुन चक्रवर्तींच्या हेल्थबद्दलचे अपडेट जारी करण्यात आले आहे. रुग्णालयाने म्हटले की, मिथुन चक्रवर्तींना Ischemic Cerebrovascular Stroke झाला आहे. अशातच दिग्दर्शक पथिकृत बसू (Pathikrit Basu) यांनी मिथुन चक्रवर्तींच्या हेल्थसंदर्भातील अपडेट शेअर केले आहे. पथिकृत बसू मिथुन चक्रवर्तींना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. यानंतर बसू यांनी मीडियाशी बातचीत करत मिथुन चक्रवर्तींच्या हेल्थबद्दल अपेड शेअर केली आहे.

मिथुन चक्रवर्तींच्या हेल्थबद्दल पथिकृत बसु यांनी दिली अपडेट
शनिवारी (10 फेब्रुवारी) पथिकृत बसू मिथुन चक्रवर्तींना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मिथुन चक्रवर्तींची प्रकृती आता स्थिर असल्याचे बसू यांनी सांगितले आहे. मिथुन चक्रवर्तींची प्रकृती सिनेमाचा सेटवर नव्हे तर हॉटेलमधून निघताना बिघडली गेली. यामुळे मिथुन यांना सिनेमाचा शुटिंगसाठी जाता आले नाही. सध्या मिथुन चक्रवर्तींची प्रकृती स्थिर असून पुढील एक-दोन दिवसांमध्ये त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचेही बसू म्हणाले आहेत.

मिथुन चक्रवर्तींची सिनेसृष्टीतील ओळख
73 वर्षीय मिथुन चक्रवर्तींसोबत रुग्णालयात त्यांचा मुलगा आहे. मिथुन चक्रवर्ती भारतीय सिनेसृष्टीतील जेष्ठ आणि दिग्गज अभिनेते आहेत. मिथुन यांना नुकताच 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मिथुन चक्रवर्तींनी सिनेसृष्टीत काही हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. हिंदीसह मिथुन चक्रवर्तींनी भोजपुरी, तमिळ, तेलुगु, कन्नड सारख्या भाषांमधील सिनेमातही भुमिका साकारल्या आहेत.

आणखी वाचा : 

तमिळ सिनेसृष्टीतील या कलाकारांची ऐवढी आहे संपत्ती, ऐकून व्हाल हैराण

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला 'Fighter' सिनेमातील या Scene वरुन धाडलीय कायदेशीर नोटीस

इरफान पठाणने ॲनिव्हर्सरीनिमित्त आठ वर्षांत प्रथमच जगाला दाखवला पत्नीचा चेहरा