सुपरस्टार मामुटी यांना गाड्या जमवण्याचा शौक असून त्यांच्याकडे तब्बल ३६९ गाड्यांचे कलेक्शन आहे. या कलेक्शनमध्ये जॅग्वार एक्सजे-एल, टोयोटा लँड क्रूझर, फेरारी, मर्सिडीज, ऑडी, पोर्शे, मिनी कूपर अशा अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
कलाकारांना जस जस पैसे मिळतात तसे ते आपले छंद जोपासत असतात. बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार असे असून त्यांच्याकडे फोटो, बाईक आणि कार यांचे शौकीन आहेत. आज आपण अशाच एका स्टार अभिनेत्याबद्दल माहिती जाणून घेऊन जाणार आहेत. त्या अभिनेत्याचे कार कलेक्शन जाणून घेणार आहोत.
कोण आहे 'हा' अभिनेता?
हा अभिनेता सुपरस्टार मामुटी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आज ते आपला 74 वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना गाड्या जमवण्याचा शौक असून महागड्या गाड्यांचा प्रचंड शौक आहे. त्यांच्याकडे 15-20 नव्हे तर तब्बल 369 गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यामध्ये सर्वच प्रकारच्या गाड्यांचा समावेश असून आपण हा शौक पाहून हैराण होऊन जाल. मामुटी यांनी काही वर्षांपूर्वी देशातील पहिली मारुती-800 खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मामूटी यांनी त्यांच्या गाड्यांसाठी एक वेगळे गॅरेज देखील बांधले आहे. त्यांना त्यांची गाडी चालवत कामाच्या ठिकाणी जायला आवडत असत. आज मामुटी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कलेक्शनमध्ये कोणत्या गाड्यांचा समावेश आहे ते जाणून घेऊ.
मामुटी यांच्या कलेक्शनमध्ये कोणत्या कार आहेत?
मेगास्टार मामूटींच्या कलेक्शनमधील जॅग्वार एक्सजे-एल (कॅविअर) ही नवीन कार आहे. मामुटी यांनी या गाडीच्या पेट्रोल आणि डिझेल दोनही प्रकारच्या गाड्या घेतल्या आहेत. केच नाही तर त्यांचा नोंदणी क्रमांक (केएल ७ बीटी ३६९) देखील त्यांच्या ३६९ कलेक्शनवर आधारित आहे. त्यांच्या बहुतेक कारमध्ये ३६९ हा क्रमांक कॉमन आहे.
मामूटींच्या कलेक्शनमध्ये टोयोटा लँड क्रूझर एलसी 200, फेरारी, मर्सिडीज आणि ऑडीचे अनेक मॉडेल, पोर्शे, टोयोटा फॉर्च्युनर, मिनी कूपर एस, एफ 10 बीएमडब्ल्यू 530 डी आणि 525 डी, ई 46 बीएमडब्ल्यू एम 3, मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट, फोक्सवॅगन पासॅट एक्स 2 आणि अनेक एसयूव्हींचा समावेश आहे. मामुटी यांच्याकडे आयशर कारवां यांचा समावेश आहे.
