- Home
- Entertainment
- मानसी नाईकचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भूमिकाच अशी की प्रेक्षक मारतील शिट्या
मानसी नाईकचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भूमिकाच अशी की प्रेक्षक मारतील शिट्या
मानसी नाईक: अभिनेत्री मानसी नाईक 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुबोध भावे दिसणार आहे. एका मुलाखतीत तिने इतकी वर्षे चित्रपटांपासून दूर का होती.

मानसी नाईकचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भूमिकाच अशी की प्रेक्षक मारतील शिट्या
अभिनेत्री मानसी नाईक तिच्या अभिनयासाठी, डान्ससाठी खासकरून ओळखली जाते. अनेक वर्षी ती चित्रपटांमध्ये दिसून आली नसून प्रेक्षक तिला विसरली नाही. आता लवकरच ती सकाळ तर होऊ द्या या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मानसीसोबत कोण काम करणार?
मानसीसोबत अभिनेता सुबोध भावे काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली. ही गाणी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता मानसीने एका मुलाखतीत इतकी वर्ष चित्रपटांत का दिसली नाही, याबद्दल तिने माहिती दिली.
मी काहीतरी गमावलं असं अजिबात नाही
मानसी नाईक बोलताना म्हणाली की, चित्रपट आले नाहीत, असं नाही. चित्रपटासाठी मला विचारणा झाली. जेव्हा मी पदार्पण केलं, तेव्हाही मी चित्रपटातून पदार्पण केलं होतं. मग मालिका केली. नंतर माझं काम सुरु झालं.
मराठी इंडस्ट्री कंटेंटसाठी ओळखली जाते
मराठी इंडस्ट्री कंटेंटसाठी खासकरून ओळखली जाते. मला काम करायचं होत की, मला अभिनय करायचा होता, हा फरक आहे. मला अभिनय निवडायचा होता. आपण चित्रपटात दिसतोय, आपण चित्रपट केला, तो चित्रपटामध्ये दिसणार मला काम करायचं नाही.
जे मला मिळालं नाही, त्याचा पश्चाताप वाटत नाही
मला पाहिजे तसा चित्रपट मिळाला नाही, त्याचा मला काहीच पश्चाताप वाटत नाही. मी असंही म्हणणार नाही की लोकांनी मला संधी दिली नाही किंवा माझ्यावर विश्वास दाखवला नाही. कारण प्रत्येकाची एक निवड असते.
मानसी नाईकने ब्रेक का घेतला?
मानसी नाईकने ब्रेक घेतल्यानंतर दोन पात्री काम करणे ही माझ्यासाठी परीक्षा आहे. पण बरं झालं मी तो ब्रेक घेतला. कारण मी ज्या चित्रपटात काम केलं त्यात लक्ष देऊन काम करणं गरजेचं होतं. मला दडपणाखाली काम करायला आवडत असं तिने म्हटलं आहे.

