अभिनेत्री माधुरी पवारचा दुबईतील बुर्ज खलिफा जवळील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रानबाजार फेम अभिनेत्रीने 'आश्विनी ये ना' या गाण्यावर ठेका धरला आहे.

मराठी सिनेमात काम करणारे अनेक कलाकार परदेशात फिरत असतात. ते तिथं गेल्यानंतर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही अमेरिकेला गेली होती. त्यावेळी तिने केलेला डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. आता आणखी एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झालेला दिसून आला आहे.

माधुरी पवारचा व्हिडीओ झाला व्हायरल 

अभिनेत्री आणि डान्सर माधुरी पवारचा दुबई येथील डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रानबाजार या सिरीजमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. या अभिनेत्रीने बुर्ज खलिफाला भेट दिली होती आणि तिथं गेल्यानंतर तिने एक डान्स केला होता, तो सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला.

View post on Instagram

माधुरीने आश्विनी ये ना गाण्यावर धरला ठेका

माधुरीने यावेळी बुर्ज खलिफाजवळ डान्स केला आणि त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तिने या व्हिडिओला कमेंट करताना मराठी गर्व आणि बुर्ज खलिफा दोनही उंचच उंच असं लिहिलं आहे. नेटवर या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या.