मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने नुकताच साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभूराज आहे. 

प्राजक्ता गायकवाड ही मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या साखरपुड्यातील फोटो व्हायरल झाले असून ती यामध्ये खूप सुंदर दिसून आली आहे. महाराणी येसूबाईची प्राजक्ता यांनी केलेली भूमिका सगळीकडं प्रसिद्ध झाली होती. या अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती आणि ७ ऑगस्टला तीचा साखरपुडा होऊन गेला आहे.

अभिनेत्रीचा पती कोण आहे? 

अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिचा होणारा नवरा कोण याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. प्राजक्ताने तिच्या अकाऊंटवरून तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभूराज असून तिने सोशल मीडियावरून दोघांचे फोटो शेअर केलेत.

ब्लाउजने लक्ष वेधलं 

प्राजक्ताने घातलेल्या ब्लाउजने लक्ष वेधून घेतलं आहे. तिने तिच्या ब्लाउजवर मागून शंभूराज असं नाव लिहून घेतलं होतं. यावेळी तिने व्हाईट रंगाची डिझायनर साडी घातली होती. तिने घातलेल्या साडीमुळे लक्ष वेधून घेतलं होत. यावे तिने लाल रंगाचा शेला घातला होता. प्राजक्ताने साखरपुड्यासाठी रॉयल लूक केला होता आणि ती उठून दिसत होती.

नवऱ्याने शेरवाणीवर प्राजक्ता लिहिलं होत 

नवऱ्याने शेरवाणीवर प्राजक्ता असं लिहिलं होतं. या दोघांवर मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना अनेकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता ही सोशल मीडियावर नियमितपणे पोस्ट टाकत असते. तिला फॉलो करणाऱ्या फॅन्सची संख्या मोठी आहे.