अमीर खानच्या भावाने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक आरोप केले आहेत. ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्ससोबतच्या त्याच्या संबंधांवर आणि त्यांच्या मुलाबद्दल खुलासे झाले आहेत. जेसिकाने नंतर दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले.

अभिनेता अमीर खान याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक दावे प्रतिदावे केले जातात. अमीरच्या भावाने स्वतःच्या कुटुंबावरच धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानं काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये त्यानं हे दावे केले होते. अमीर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक दावे प्रतिदावे केले जातात, आता परत एकदा त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

अमीरचे कोणाबरोबर संबंध होते? 

काही वर्षांपूर्वी तर त्याचे आणि ब्रिटिश पत्रकार जेसिका हाइन्स यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नंतर त्याच्या भावाने त्या दोघांचे संबंध असल्याच्या चर्चांना पुष्टी दिली होती. त्या दोघांना एक मुलगा असल्याची माहिती त्याच्या भावाने हा मुलगा नेमका कोण? याच्या चर्चा असून आता त्याचा एक फोटोही व्हायरल होत आहे.

रिपोर्टने काय माहिती दिली? 

आमिर खान आणि जेसिका 'गुलाम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रिलेशनशिपमध्ये आले होते. नंतर जेसिका गरोदर असल्याचं समजल्यावर अमीर खानने कथितरित्या या मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आणि तिला गर्भपात करण्यास सांगितलं. मात्र जेसिकाने बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला आणि तो २००० साली जन्मला.

जेसिकाने कोणाशी लग्न केले? 

जेसिकानं 2007 मध्ये लंडनस्थित व्यावसायिक विलियम Talbot यांच्याशी लग्न केलं. ती भारतात आलेली असताना विलियमने तिच्या मुलाची खूप काळजी घेतली असं तिने म्हटलं होत. जेसिकाच्या या मुलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, आता त्याचे आणखी काही फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत. आता जान मोठा झाला असून त्याचा चेहरा अमीरवर गेल्याच त्यामध्ये म्हणण्यात आलं आहे.