कंगना रनौत आता 'स्कॅरी पिक्चर' या नव्या हॉरर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणा डग्गुबतीने 'हॉररकॉन इंडिया २०२६' मध्ये या सिनेमाची घोषणा केली. यातून तेलुगू दिग्दर्शक रवी बाबू बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

कंगना रनौत पुन्हा एकदा हॉरर विश्वात परतण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी तिच्या हाती एक भन्नाट प्रोजेक्ट लागला आहे. ३१ ऑक्टोबरला नवी दिल्लीत झालेल्या 'हॉररकॉन इंडिया २०२६' (HorrorCon India 2026) मध्ये अभिनेता-निर्माता राणा डग्गुबतीने 'स्कॅरी पिक्चर' (Scary Picture) या आगामी हॉरर सिनेमाची घोषणा केली. यात कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कंगनाच्या 'स्कॅरी पिक्चर'बद्दल काय माहिती आहे?

हॅलोविनच्या (Halloween) सेलिब्रेशनदरम्यान राणाने या सिनेमाच्या नावाची घोषणा केली. सोबतच दिग्दर्शकाचीही माहिती दिली. तेलुगू दिग्दर्शक रवी बाबू या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. हा त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा असणार आहे.

या कार्यक्रमात बोलताना राणा म्हणाला की, रवी बाबू हे त्याचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक तेलुगू हॉरर सिनेमे बनवले आहेत. 'हॉररकॉन'च्या मंचावर पहिल्यांदाच या सिनेमाची अधिकृत घोषणा होत असल्याचंही त्याने सांगितलं.

Scroll to load tweet…

कंगना पुन्हा एकदा हॉरर जॉनरमध्ये

कंगना नुकतीच 'भारत भाग्य विधाता' या सिनेमात दिसली होती. तिचा शेवटचा हॉरर सिनेमा २०२३ मध्ये आलेला 'चंद्रमुखी २' हा होता. पी. वासू यांनी दिग्दर्शित केलेल्या या तमिळ सिनेमात ती राघव लॉरेन्ससोबत झळकली होती.

'स्कॅरी पिक्चर'च्या या भन्नाट कॉम्बिनेशनमुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. पण या सिनेमाची कथा, इतर स्टारकास्ट आणि रिलीज डेट अजूनही गुलदस्त्यातच आहे.