रेड २ चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यासोबत एका मराठी अभिनेत्रीने काम केले आहे. रितिका क्षोत्री हिने या चित्रपटात रितेश देशमुख सोबत काम केले असून तिने सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला आहे.
अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या रेड २ चित्रपटाने चांगली कमाई केली. यावर्षी चांगला प्रतिसाद मिळालेल्या चित्रपटांमध्ये रेड २ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता. या चित्रपटात या दोघांसोबत वाणी कपूरने काम केलं होतं. या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री काम करत होती आणि तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती होती.
मराठी अभिनेत्रीचे नाव काय आहे?
मराठी अभिनेत्रीचे नाव रितिका क्षोत्री असून तिने चित्रपटात रितेश देशमुख सोबत काम केलं. तिने सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली आहे. तिने सोशल मीडियावर लिहिताना खासकरून रितेश देशमुख आणि अजय देवगण यांचा उल्लेख केला होता. यावेळी बोलताना तिने तिचा अनुभव व्यक्त केला आहे.
रितिका काय म्हणाली?
रितिकाने बोलताना म्हटलं आहे की, खूपच भारी अनुभव होता. मी या चित्रपटासाठी पहिल्यांदा एक ऑडिशन दिली होती आणि त्यानंतर मला माझी निवड झाल्याच फोन करून माहिती देण्यात आली. यावेळी तिने तिची ५ ते ६ सीनसाठी शूटिंग होणार असल्याची माहिती दिली. तिने ही माहिती देताना आपण सेटवर गेल्यानंतर जे समोर येतंय ते करायला हवं हे सांगितलं.
पहिला सीन रितेश सरांबरोबर होता
रितिकाचा पहिला सीन रितेश सरांबरोबर होता. तिने यावेळी बोलताना मी रितिका रितेश देशमुखचा मोठी फॅन होती. ते सगळ्यांबरोबर बोलताना अहो जाओ करत बोलत असतात. माझा यावेळी क्लोज सीन शूट झाला आणि यावेळी रितेश यावेळी येथे उपस्थित होते. ते उपस्थित राहिल्यामुळे माझ्यासाठी तो छान क्षण असल्याचं म्हटलं होत.
अजय देवगणबद्दल काय म्हणाली?
यावेळी रितिका बोलताना म्हणाली की, दोन तीन दिवसांनी मी अजय सरांबरोबर काम करत होते. तो सीन अगदी चार मिनिटांमध्ये शूट करण्यात आला होता. तो सीन आम्ही एकदाच शूट केला होता. यावेळी शूट सुरु असताना हजार ते दीड हजार प्रेक्षक उपस्थित होते. त्यावेळचा सीन माझ्यासाठी खूप छान होता असं त्यांनी म्हटलं आहे.
