- Home
- Entertainment
- Asarani: इंदिरा गांधींमुळे 'या' अभिनेत्याला सिनेमात मिळालं काम, त्याच्या मृत्यूनंतर पुण्यातील कॉलेज राहणार बंद?
Asarani: इंदिरा गांधींमुळे 'या' अभिनेत्याला सिनेमात मिळालं काम, त्याच्या मृत्यूनंतर पुण्यातील कॉलेज राहणार बंद?
अभिनेते गोवर्धन असरानी यांचे निधन झाले असून, त्यांच्या संघर्षाच्या दिवसांतील एक आठवण समोर आली आहे. 'अंग्रेजों के जमाने के जेलर' या संवादासाठी प्रसिद्ध असलेल्या असरानी यांना एकेकाळी काम मिळवण्यासाठी खुद्द इंदिरा गांधींनी मदत केली होती.

Asarani: इंदिरा गांधींमुळे 'या' अभिनेत्याला सिनेमात मिळालं काम, त्याच्या मृत्यूनंतर पुण्यातील कॉलेज राहणार बंद?
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते गोवर्धन असरानी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेमा सृष्टीवर दुःखाची शोककळा पसरली आहे. त्या अनेक दिवसांपासून प्रकृतीमुळे रुग्णालयात दाखल झाले होते.
सोमवारी दुपारी झालं निधन
सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. ‘हम अंग्रेज़ों के जमाने के जेलर हैं’ व हमारे जेलमें सुरंग?’ हे विशिष्ट लकबीत त्यांनी उच्चारलेले संवाद चित्रपटप्रेमींच्या कायम स्मरणात आहेत.
इंदिरा गांधी यांच्यासोबतच काय आहे किस्सा
इंदिरा गांधी यांच्यासोबत गोवर्धन यांचा किस्सा असून तो आपण जाणून घेऊयात. गोवर्धन यांनी ५० वर्षांपासून जवळपास ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांना काम मिळवून देण्यासाठी मदत केली.
इंदिरा गांधी यांच्यासोबतच काय आहे किस्सा
फिल्म इन्स्टिट्यूटची पदवी मिळवून गोवर्धन यांना २ वर्ष नोकरी मिळत नव्हती. त्यावेळी त्यांना काम मिळवून देण्यासाठी चक्क इंदिरा गांधी यांनी मदत केली होती. मुंबईत आल्यावर त्यांनी संगीत दिग्दर्शक नौशाद यांची भेट घेतली होती.
नौशात यांच्याकडून मदत न मिळाल्यावर जयपूरला परतले
नौशात यांच्याकडून मदत न मिळाल्यावर ते जयपूरला परत आले. येथे आल्यानंतर त्यांना वडिलांनी दुकानात काम करायला सांगितले पण त्यांना मात्र अभिनयातच करिअर करायचे होते.
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मिळाला प्रवेश
फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गोवर्धन यांना नंतर प्रवेश मिळाला आणि तिथून पुढं त्यांचं आयुष्य बदलून गेलं. त्यांनी या अभ्यासक्रमाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आर्थिक खर्च चालवण्यासाठी प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली.
दोन वर्ष कामासाठी केला संघर्ष
दोन वर्ष गोवर्धन यांनी कामासाठी संघर्ष केला. इंदिरा गांधी पुण्यात आल्यानंतर गोवर्धन यांची समस्या त्यांना सांगण्यात आली. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर इंदिरा यांनी गोवर्धन यांना काम देण्यात यावं असं सांगितलं आणि मग ते मिळायला सुरुवात झाली.