- Home
- Entertainment
- सलमान खान 'या' देशात दहशतवादी म्हणून जाहीर, लवकरच पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता
सलमान खान 'या' देशात दहशतवादी म्हणून जाहीर, लवकरच पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता
एका व्हायरल व्हिडीओमुळे पाकिस्तानने अभिनेता सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित केल्याचा दावा केला जात आहे. बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्यामुळे त्याचे नाव दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सलमान खान 'या' देशात दहशतवादी म्हणून जाहीर, लवकरच पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता
बॉलिवूडचा भाई सलमान खान हा कायमच चर्चांमध्ये येत असतो. अलीकडेच सलमानला पाकिस्तानने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. त्याच नाव का घोषित करण्यात आल, यामागे एक मोठी गोष्ट आहे.
पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने अधिकृत सूचना केली जारी
पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने अधिकृत सूचना जारी केली आहे. सलमान खानचा समावेश चौथ्या सूचीमध्ये करण्यात आला आहे. ही सूची दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत येते.
सलमानच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
सलमानच्या टीमकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये त्याने पाकिस्तान आणि बलुचिस्तान असा वेगवेगळा उल्लेख केला आहे.
सलमान काय म्हणाला?
सलमान यावेळी बोलताना म्हणाला की, हे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत, प्रत्येकजण सौदी अरेबियामध्ये कष्ट करत आहे.
बलुचिस्तानचे नेते काय म्हणाले?
चित्रपट अभिनेता सलमान खान याने बलुचिस्तानचा उल्लेख केल्यामुळे येथील ६ कोटी लोकांना प्रचंड आनंद झाला आहे. सलमान खान हा बिग बॉस १९ चा होस्ट आहे.
सलमानचा लवकरच नवीन चित्रपट येणार
सलमान खानचा नवीन चित्रपट लवकरच चित्रपटगृहात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली येथे झालेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हे युद्ध दगड, काठी याच्या माध्यमातून लढले गेले होते.