- Home
- Entertainment
- जान्हवीचा बॉयफ्रेंड 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं पळवला, नाव ऐकून म्हणाल नशीब काढलं पोरीने
जान्हवीचा बॉयफ्रेंड 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं पळवला, नाव ऐकून म्हणाल नशीब काढलं पोरीने
अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया असून तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर एक व्यावसायिक आणि पोलो खेळाडू आहे, ज्याने भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.

जान्हवीचा बॉयफ्रेंड 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं पळवला, नाव ऐकून म्हणाल नशीब काढलं पोरीने
जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आता जगजाहीर झाला आहे. तारा सुतारीया या अभिनेत्रीसोबत त्याचे नाव काही दिवसांपासून जोडलं गेलं आहे. जान्हवी आणि तिचा बॉयफ्रेंड या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहण्यात आलं आहे.
जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड कोण आहे?
जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. तो स्वतः एक बिझनेसमन असून अनेकदा त्याला पोलो खेळ खेळताना पाहण्यात आलं आहे.
शिखरचे वडील काय करतात?
शिखरचे वडील हे स्वतः बिझनेसमन आहेत. शिखर आणि जान्हवीची पहिली भेट शाळेत झाली होती. शालेय जीवनापासूनच या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. परंतु 2018 मध्ये जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं.
ब्रेकअपच्या चार वर्षानंतर परत आले एकत्र
ब्रेकअपच्या चार वर्षानंतर दोघे परत एकत्र आले होते. 2022 मध्ये दोघांनी पॅचअप केलं आणि तेव्हापासून त्यांना नेहमीच एकत्र पाहिलं जातं. दोघांच्या कुटुंबियांना अनेकदा एकत्र पाहण्यात आलं आहे.
शीखरने कोणत्या खेळात भारताचं प्रतिनिधित्व केलं?
शिखरने लंडनमधल्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून ग्लोबल फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादित केली. तो रॉयल जयपूर पोलो स्क्वॉडचाही भाग होता. 2013 मध्ये त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

