- Home
- Entertainment
- Movies Box Office Collection Aug 9 : या चित्रपटांनी शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
Movies Box Office Collection Aug 9 : या चित्रपटांनी शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'किंगडम', 'महाअवतार नरसिम्हा', 'सन ऑफ सरदार २' आणि 'सैयारा' या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहित.
Box Office Collection 9th august: शुक्रवारी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
दर शुक्रवारी नवीन चित्रपट येत असतो. आपण मागे काही दिवसांपूर्वी आलेल्या चित्रपटांनी किती कमाई केली आहे त्याची माहिती जाणून घेऊयात.
Kingdom - किंगडम
विजय देवरकोंडाचा प्रमुख रोल असलेला थरारक ‘Kingdom’ चा बॉक्स ऑफिसवरचा प्रवास मागील आठवड्यापासून चांगला सुरु आहे. दुसऱ्या शुक्रवारी (दिनांक ८ ऑगस्ट) या चित्रपटाने अंदाजे ₹१.२५ कोटीची कमाई केली असून एकूण भारतातील कमाई जवळपास ₹४८ कोटीवर पोहोचली आहे.
Mahavatar Narsimha - महाअवतार नरसिम्हा
'महाअवतार नरसिम्हा’ या भाषांतरित हिंदी चित्रपटाला चित्रपटगृहांत मोठी पसंती मिळत असून, १५ व्या दिवशी यातून एकूण ₹११७ कोटींहून अधिक कमाई झाली आहे. हा चित्रपट अनेकवेळा हाऊसफुल दाखवण्यात आला आहे.
‘Son of Sardaar 2— सन ऑफ सरदार २
अजय देवगणचा ‘Son of Sardaar 2’ या कॉमेडी ड्रामाला बॉक्स ऑफिसवर चांगलं स्थान मिळत आहे. आठव्या दिवशी चित्रपटाने जवळपास ₹३५ कोटींच्या कमाईच्या टप्प्यावर स्थिर कामगिरी केली आहे, मात्र इतर ब्लॉकबस्टर चित्रपटांशी स्पर्धा असल्याने हे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आहेत.
Saiyaara - सैयारा
मोहीत सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटाने तिसरा आठवडा संपताना भारतात ₹३०० कोटींचे टप्पे पार केले. या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.