- Home
- Entertainment
- Box Office Collection 25th August: सोमवारी गाजत असलेल्या 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
Box Office Collection 25th August: सोमवारी गाजत असलेल्या 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
War 2, कुली, महाअवतार नरसिम्हा आणि सैयारा या चित्रपटांनी सोमवारी चांगली कमाई केली आहे. War 2 ने १.०१ कोटी, कुली ने ९.८ कोटी, महाअवतार नरसिम्हा ने ६.१५ कोटी आणि सैयारा ने १.८७ कोटींची कमाई केली.

Box Office Collection 25th August: सोमवारी गाजत असलेल्या 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
२५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवरून स्पष्ट होते की बॉक्स ऑफिसवर अजूनही मोठी चढाओढ सुरू आहे. War 2 ने सोमवारी ₹1 कोटीची कमाई करत एकूण ₹223 कोटींचा टप्पा गाठला. दुसरीकडे Coolie ने दमदार कमाई कायम ठेवली असून सोमवारी जवळपास ₹9.8 कोटी मिळवत एकूण ₹256 कोटींचा आकडा पार केला.
War 2
वार २ हा चित्रपट तिकीट खिडकीवर चांगला चालला आहे. या चित्रपटाने सोमवारी १ कोटी १ लाखांची कमाई केली. त्यांनी बॉक्स ऑफिसवर एकूण २२३.०१ कोटींची कमाई केली आहे.
Coolie
कुली हा रजनीकांतचा चित्रपट असून त्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटाने काल ९.८ कोटींची कमाई केली असून एकूण २२५.८ कोटी कमावले आहेत.
Mahavatar Narsimha
महाअवतार नरसिम्हा हा चित्रपट तिकीटखिडकीवर चांगला चालला. या चित्रपटाने काल ६.१५ कोटींची कमाई केली असून एकूण गल्ला २३१ कोटींचा कमावला आहे.
Saiyaara
सैयारा या चित्रपटाला तरुणाईने डोक्यावर उचलून घेतलं होतं. या चित्रपटाने काल १.८७ कोटींची कमाई केली. त्यांनी आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३२८ कोटी कमावले आहेत.