- Home
- Entertainment
- Box Office Collection 7th September: रविवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
Box Office Collection 7th September: रविवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
बागी ४, परम सुंदरी, सैयारा आणि वार २ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. टायगर श्रॉफचा बागी ४ ने ३० कोटी, सिद्धार्थ-जान्हवीच्या परम सुंदरीने ४३.७३ कोटी, सैयाराने ८३ कोटी आणि वार २ ने पहिल्याच दिवशी ४६ कोटींची कमाई केली.

Box Office Collection ७th September: रविवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
बॉक्स ऑफिसवर परम सुंदरी आणि बागी २ हे चित्रपट आले असून त्यांनी चांगली कमाई केली आहे. त्यासोबतच कुली, सैयारा आणि वार २ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही टिकून आहेत. सैयारा या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगले प्रेम दिले.
Baaghi 4
बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफचा बागी ४ हा चित्रपट आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२ कोटींची कमाई केली असून तिसऱ्या दिवशीपर्यंत हा आकडा ३० कोटींपर्यंत पोहचला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, संजय दत्त आणि सोनम बाजवा प्रमुख भूमिकेत आहेत.
Param Sundari
उत्तर आणि दक्षिणेतील प्रेमकथा असणाऱ्या परम सुंदरी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत असून पहिल्याच दिवशी आठवड्यात ४३.७३ कोटींची कमाई केली आहे.
Saiyaara
सैयारा हा रोमँटिक चित्रपट असून आहान पांडे आणि अनित पड्डा यांनी या चित्रपटातून पदार्पण केलं होत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० कोटींची कमाई केली. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ८३ कोटींची एकूण कमाई केली होती.
War 2
वार २ या चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर हे प्रमुख भूमिकेत आहेत. शुक्रवारी या चित्रपटाने ४६ कोटींची कमाई केली होती आणि नंतर शनिवारी २७ कोटी रुपये कमवले. हा एक थरारक स्पाय चित्रपट असून त्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर उचलून धरले.