Movie Release: 'या' प्रसिद्ध ४ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
परम सुंदरी, बागी ४, वार २ आणि सैयारा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटांच्या कमाईचे आकडे जाणून घ्या.

Movie Release: 'या' प्रसिद्ध ४ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली?
नवीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले असून त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. परम सुंदरी आणि बागी ४ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जलवा दाखवला असून सैयारा अजूनही काही ठिकाणी सुरु असल्याचे दिसून आलं आहे.
Param Sundari
परम सुंदरी हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये साऊथ आणि नॉर्थ भागातील दोघांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी ७.२५ कोटींची कमाई केली आणि एकूण कमाई या चित्रपटाने आतापर्यंत ४८.८० कोटींची केली आहे.
Baaghi 4
बागी चित्रपटात टायगर श्रॉफ हा प्रमुख भूमिकेत आहे. सोनम बाजवा, संजय दत्त यांनी यावेळी अभिनय केला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात ५३.७४ कोटींची कमाई केली आणि एकूण जवळपास ६३.४१ कोटींची कमाई केली आहे.
War 2
वार २ या चित्रपटात हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांनी काम केलं आहे. यामध्ये कियारा अडवाणीने दिलेल्या सीनमुळे चर्चा रंगली होती. या चित्रपटाने भारतात नेट 184.90 कोटी आणि जगभर 302.86 कोटी कमवले आहेत.
Saiyaara
मोहित सुरीचा सैयारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल करून दाखवली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २२ कोटींची कमाई केली असून भारतात ३२९.२ कोटी आणि जगभरात ५७०.६७ कोटी रुपये कमवले आहेत.