- Home
- Entertainment
- नेहा शर्मा वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात, 'या' पार्टीचे सरकार स्थापन होणार असल्याचा केला दावा
नेहा शर्मा वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात, 'या' पार्टीचे सरकार स्थापन होणार असल्याचा केला दावा
बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा बिहारमधील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिने तिचे वडील आणि भागलपूरमधील काँग्रेस उमेदवार अजित शर्मा यांच्यासाठी जोरदार प्रचार केला.

नेहा शर्मा वडिलांच्या प्रचारासाठी मैदानात, 'या' पार्टीचे सरकार स्थापन होणार असल्याचा केला दावा
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. ११ नोंव्हेंबर रोजी येथे मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. यावेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचं चित्र दिसून आलं.
नेहा शर्माने वडिलांसाठी घेतली मेहनत
नेहा शर्माचे वडील अजित शर्मा हे काँग्रेसचे नेते असून ते निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांच्या प्रचारासाठी मुलगी नेहा शर्माने प्रचार केल्याचं दिसून आल. तिने सोशल मीडियावर वडिलांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली होती.
नेहा शर्मा सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणते?
नेहा शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून त्यामध्ये तिने काँग्रेसचा विजय होईल असं म्हटलं आहे. भागलपूरमधील जनतेला माझे हृदय कुठे आहे ते माहित आहे. माझे वडील नेहमीच काँग्रेस पक्षासोबत राहिले आहेत. यावेळी देवाच्या कृपेने इंडिया आघाडीचे सरकार येईल.
याआधी नेहाने केले रोड शो
याआधी नेहाने रोड शो केल्याचं दिसून आलं आहे. यावेळी तिच्या वडिलांच्या समर्थनार्थ हजारो लोक उपस्थित राहिले होते. यावेळी उपस्थित लोकांना हात जोडून मतदान करा असे अवाहन नेहा करत होती.
भागलपूर मतदारसंघात तिरंगी लढत
भागलपूर मतदारसंघात तिरंगी लढत होत असल्याचं दिसून आल आहे. इथून नेहा शर्माचे वडील अजित शर्मा यांच्या विरोधात भाजपकडून रोहित पांडे हे निवडणूक लढवत आहेत. प्रशांत किशोर यांच्या पक्षाने या ठिकाणी उमेदवार उभा केलाय.
नेहा शर्मा कोण आहे?
नेहा शर्मा ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिचे चित्रपट येऊन गेले आहेत. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय राहत असून तिचे करोडोंमध्ये फॉलोवर्स असल्याचं दिसून आलं आहे.

